शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

आज विराजमान होतील महापौर

By admin | Published: April 30, 2017 12:30 AM

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ३० एप्रिलला निवडणूक घेण्यात येत आहे.

उपमहापौरांचीही निवड : मनपाच्या सभागृहात निवडणूक चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ३० एप्रिलला निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र ही निवडणूक केवळ औपचारिकता असून भाजपाच्या अंजली घोटेकर या महापौरपदी विराजमान होईल, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. याच दिवशीे उपमहापौर व स्थायी समितीच्या सभापतींचीही निवड होणार आहे. मनपा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात केवळ ५२ टक्केच मतदान झाले. २१ एप्रिलला जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी झाली. यात भाजपाने प्रारंभीपासूनच आघाडी घेतली होती. ६६ पैकी ३६ उमेदवार निवडून आल्याने भाजपाने सत्ता स्थापनेसाठी होणारा वादविवाद तेथेच संपवून टाकला. मागील पंचवार्षिकमध्ये भाजप नगरसेवकांची संख्या १६ होती. यंदा यात दुपटीने वाढ होत ती संख्या ३६ च्या घरात पोहचली आहे. काँग्रेसची मात्र मोठी घसरण झाली. मागील पंचवार्षिकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उदयास आला होता. तब्बल २६ नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र काँग्रेसला केवळ १२ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसला हादरा आणि भाजपाची मुसंडी हा केवळ एकच बदल झालेला नाही. यंदा मतदारांनी अनेक विद्यमान नगरसेवकांना पसंदी दर्शविली नाही. विद्यमान नगरसेवकांपैकी यंदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या तब्बल २५ नगरसेवकांना मतदारांनी कौल दिला नाही. त्यामुळे त्यांना पुढील पाच वर्ष घरीच बसावे लागणार आहे. मोठ्या प्रमाणात विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी नाकारले असले तरी १७ विद्यमान नगरसेवकांवर जनतेने पुन्हा विश्वास ठेवला आहे. त्यांना या निवडणुकीत निवडून देऊन परत एकदा सभागृहात पाठविले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांना मनपाचे कारभारी म्हणून नेमले आहे. असे तब्बल ४९ नवे चेहरे मनपात नगरसेवक म्हणून दाखल झाले आहे. महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे मनपात महिला राज येईल, हे महापौर पदाच्या आरक्षणानंतरच स्पष्ट झाले होते. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या अंजली घोटेकर यांनी आपले नामांकन दाखल केले आहे तर बसपाच्या रंजना यादव यांनीही आपले नामांकन दाखल केले आहे. उपमहापौर पदासाठी भाजपाचे अनिल फुलझेले यांनी नामांकन दाखल केले आहे. उद्या ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मनपाच्या सभागृहात महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. मात्र ही निवडणूक केवळ औपचारिकता असणार आहे. मनपा निवडणुकीत भाजपाने ६६ पैकी ३६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे भाजपाच्या अंजली घोटेकर याच महापौरपदी विराजमान होईल, हे निश्चित झाले आहे. उपमहापौरपदी अनिल फुलझेले हे विराजमान होतील. महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर एक-दोन तासातच स्थायी समिती सभापती पदाची निवड केली जाणार आहे. स्वीकृत सदस्यांचीही निवड याच दिवशी केली जाऊ शकते अशी माहिती आहे. ना. मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकराज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज शनिवारी चंद्रपुरात मुक्कामी आहेत. त्यामुळे ना. मुनगंटीवार यांनी आज रात्री ९.३० वाजता भाजपाच्या विजयी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीतच मनपाचे स्थायी समिती सभापती व स्वीकृत सदस्य कोण असेल, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.स्वीकृत सदस्य समाजातून निवडावेमहानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होते. हे सदस्य समाजातील पर्यावरण, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रातील गणमान्य व्यक्त असावे, अशी मार्गदर्शक तत्वे आहेत. ते राजकारणातील व्यक्ती नसावे. त्यामुळे यावेळी अशा व्यक्तींची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी, अशी मागणी ग्रिन प्लॅनेट सोसायटीचे प्रा.सुरेश चोपणे यांनी केली आहे.