ठळक मुद्देसोमवारी स्वीकारणार पदभार : नियती ठाकर यांची मुंबईच्या उपायुक्तपदी बदली
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची शुक्रवारी पदोन्नतीने मुंबईच्या उपायुक्तपदी स्थानांतरण झाले. त्यांच्या जागी गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची पदोन्नतीने चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत.पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या बदलीनंतर एक ते दीड वर्षापूर्वीच नियती ठाकर यांची पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपुरात नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या कमी कार्यकाळात दारूविक्रेत्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला होता.महिन्यापूर्वी चंद्रपूर शहरात घडलेल्या अपघाताच्या दोन घटनानंतर त्यांनी जिल्हाभरात हेल्मेट सक्तीचे आदेश जारी केले. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची पोलीस कर्मचाऱ्यांत ओळख होती. मात्र अचानक त्यांची मुंबईच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने स्थानांतरण करण्यात आले आहे.ठाणे व रायगड जिल्ह्यात दिली सेवाचंद्रपुरात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होत असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्यात काम केले. तर पोलीस अधीक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातही ते कार्यरत होते. तेथून गडचिरोली जिल्ह्यात विशेष अभियान योजना अंतर्गत अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. आता त्यांची चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून ते सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत.एमसीव्ही महेश्वर रेड्डी नवे जिल्हा पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:04 PM