चंद्रपूर जिल्ह्यात-- कोविड केअर सेंटर आहेत. या ठिकाणी --- रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या भोजनाची आणि नाश्त्याची व्यवस्था कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. जेवणाच्या संपूर्ण व्यवस्थेवर स्थानिक प्रशासनाचे लक्ष असते. ‘लोकमत’ने कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तर जेवणाचा व नाश्त्याचा दर्जा चांगल्या असल्याची प्रतिक्रिया दिली. एखाद्या वेळेस जेवणात कमी जास्त होत असते. परंतु, सकाळी ८ वाजता नास्ता, सकाळी ११ वाजता जेवण, सायंकाळी ४ वाजता चाय, सायंकाळी ८ वाजता जेवण मिळत असल्याचे सांगितले. नास्त्यामध्ये कडधान्ये, पोहा, चना सोबतच दररोज विविध प्रकारचा नास्ता व पोष्टिक आहार देण्यात येतो. कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छतेच्या तक्रारी आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बॉक्स
वनअकादमी चंद्रपूर
येथील वनअकादमीच्या इमारतील मनपातंर्गत कोविड सेंटर सुरू आहे. येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांना मनपातर्फे उच्च दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येत आहे. जेवणाची व्यवस्था उत्तम आहे.
सैनिक स्कूल चंद्रपूर
येथील सैनिक स्कूल येथील सुसज्य इमारतीत कोविड केअर सेंटर उभारले आहे. येथे अनेकजण उपचार घेत आहे. येथील रुग्णांना वेळेवर पौष्टिक आहार देण्यात येते.
अ. जा. नवबौद्ध निवासी शाळा
विसापूर हद्दीतील भिवकुंड येथील अनुसुचित जाती नवबौद्ध निवासी शाळेमध्ये सुरू असलेल्या कोविड केंद्रात सकाळी ८ वाजता नास्ता, ११ वाजता जेवन, चार वाजता, सायंकाळी ८ वाजता जेवण देण्यात येत असल्याचे रुग्णाने सांगितले.
समाजकल्याण वसतिगृह
चंद्रपूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या सर्वच वसतिगृहात कोविड केअर सेंटर उभारले आहे. येथेसुद्धा जेवणाची व्यवस्था बरी असल्याची माहिती आहे. भिवकुंड येथील मुलींच्या वसतिगृहात १०० बेडची व्यवस्था असून
बाधितांना नियमित सेवा दिली जात आहे.
बॉक्स
अर्धवट जेवणामुळे मूलच्या कोविड सेंटरमध्ये गोंधळ
मूल येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना अपुरे आणि मोजके जेवण मिळाल्याने रविवारी दुपारच्या सुमारास नगरपालिकेच्या शाळा इमारतीतील रुग्णांनी गोंधळ घातला होता. येथील कोविड सेंटरमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा समाजकल्याण विभागांतर्गत एका कंत्राटदारमार्फत जेवण पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. रविवारी दुपारी दोन वाजले तरी नगरपालिकेच्या शाळेतील कोविड सेंटरमधील रुग्णांना जेवण देण्यात आले नाही. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.