सुधीर मुनगंटीवार : २५ लाख वृक्षारोपणाचे पीयूष गोयल यांचे आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील भूमिगत व खुल्या कोळसा खाणींबद्दल पर्यटकांना प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे खाण मंत्रालयाने त्यासाठी चंद्रपूरला मदत करावी, अशी मागणी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय ऊर्जा व खाण मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. याबद्दल सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले आहे . चार कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वांकांक्षी मोहिमेची माहिती देण्यासाठी व उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ना.मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांची नवी दिल्ली येथे श्रमशक्ती भवनात भेट घेतली. वृक्ष लागवडीच्या तयारीची त्यांना माहिती दिली. यावेळी पुढच्या वर्षी खनन मंत्रालयाच्या वतीने राज्यात २५ लाख वृक्षारोपण करण्यात येणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री गोयल यांनी ना. मुनगंटीवार यांना दिले. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील खाणविषयक बाबींवर चर्चा झाली.चंद्रपूर जिल्ह्यात मोठया प्रमाणात कोळसा खाणी आहेत. या खाणी पाहण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक, अभ्यासक येत असतात. त्यांना भूमिगत व खुल्या खाणींचे प्रचंड कुतूहल असते. जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी असल्यामुळे खाण पर्यटन अशी अभिनव संकल्पना येथे सुरू करावी, अशी त्यांनी मागणी केली. या खुल्या व भूमिगत खाण पर्यटनातून स्थानिकांना रोजगारही मिळेल. या मागण्यांच्या पूर्ततेबाबत केंद्रीय मंत्री गोयल यांनी सकारात्मकता दशबिली आणि यासंबंधी विभागाला त्वरित योग्य निर्देश देण्यात येईल, असेही सांगितले. जिल्ह्यातील जनतेचे उदरनिवार्हाचे साधन कोळसा खाणींवर अवलंबून आहे. या खाणींचा व जिल्ह्याचा बहुतेक भाग हा वेर्स्टन कोल्ड फिल्ड लिमिटेडच्या मालकीचा असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात वर्षी २५ लाख वृक्षारोपण केंद्रीय खाण मंत्रालयाच्या वतीने करण्यात यावे. यासह जिल्हयातील स्वच्छता, प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी डब्ल्यूसीएलने स्वीकारावी, अशी विनंती ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक बहुतेक जनतेचा व्यवसाय हा कोळशाशी संबधित आहे. या व्यवसायिकांना नियमित कोळसा उपलब्ध व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. मनेका गांधी यांच्याकडूनवृक्षारोपण मोहिमेचे कौतुकना. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची शास्त्री भवन येथे भेट घेऊन त्यांना १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षारोपण अभियानात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. ना. मनेका गांधी यांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात राज्यात येण्याचे आश्वासन दिले.अग्रीम निधी न भरण्याची सवलत मिळावीराज्य शासनाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ सुरू केली आहे. याकरिता राज्य शासनाने आर्थिक तरतूदीचे नियोजन केले आहे. राज्य शासन महागडे व्याजदर असणारे कर्ज फेडत आहे. असे कर्ज फेडताना राज्य शासनाला अग्रीम रक्कम भरावी लागते. हा अग्रीम निधी न भरण्याची राज्य शासनाला सवलत मिळावी. त्यामुळे राज्य शासनाला दरवर्षी ३ ते ४ हजार कोटी रूपयांची बचत करता येईल. खुल्या बाजारातून कर्ज उपलब्धतेची मयार्दा १५ हजार कोटींपर्यंत करण्यात यावी, अशी मागणीही ना. मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली.
खाण पर्यटनाला मान्यता द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 12:51 AM