हंसराज अहीर : भारताने पाकिस्तानला शक्ती दाखवून दिलीवरोरा : भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी साई मंगल कार्यालय येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात मनसेचे नेते डॉ. अनिल बुजोने, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सूर, जिल्हा परिषद सदस्य अमृता सूर, काँग्रेसच्या नगरसेविका दिपाली टिपले, सेनेच्या नगरसेविका वैशाली तडसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. या सर्वांचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्वागत केले .यावेळी बोलताना ना. अहीर बोलतांना म्हणाले कि भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल आपरेशन द्वारे अतिरेकी आणि पाकिस्तानी सैनिकांना मारून भारत जेवढा शांतप्रिय आणि सयंमी देश आहे तेवढाच बलाढ्य आणि शक्तिशालीदेखील असल्याचे दाखवून दिले. त्याची आठवण पाकिस्तानने ठेवावी, असे ना. अहीर यावेळी म्हणाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री संजय देवतळे, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना शामकुळे, जिल्हा सचिव राहुल सराफ, जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रभारी विजय राऊत, डॉ भगवान गायकवाड, सुरेश महाजन, रवी कष्टी, विजय मोकाशी, ओम मांडवकर, सुरेश महाजन चंद्रकांत गुंडांवर, अहेतेशाम अली यांच्यासह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संजय देवतळे व आ. नाना शामकुळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सूर यांनी सचिन चुटे व मनसे व किशोर टिपले, पप्पू साखरिया इतर पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला. कार्यक्रमाच्या सुरवातीला उरी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गजानन राऊत तर आभार रवी कष्टी यांनी मानले. यशस्वितेकरिता महेश श्रीरंग , देविदास ताजने, गजानन वाघधरे, भरत तेला, मधुकर ठाकरे, चंदाताई चिकटे, सुषमा कराड, अनुराधा दुर्गे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी )
वरोरा येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा
By admin | Published: October 04, 2016 12:48 AM