लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांची बैठक मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच घेतली. यामध्ये ग्रामीण तसेच शहरी भागात भाजयुमोर्चाच्या कार्याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील कार्याचे नियोजन करण्यात आले.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो महामंत्री आशिष देवकते, आशिष देवतळे उपस्थित होते. बैठकीतील चर्चेदरम्यान ग्रामीण व शहर अशा दोन्ही बाजूंचा विकास कार्यावर विचार विनीमय करण्यात आले. यामध्ये बूथ स्तरावर युवा जोडो अभियान, गाव तेथे युवा मोर्चा समिती स्थापन करणे, युवा दूत तयार करणे, भारतीय जनता युवा मोर्चा अंतर्गत कार्यकर्त्यांचा डिजिटल माहिती तयार करणे, लाभार्थी संपर्क अभियानचा माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची लोकांना माहिती देऊन त्याचा पाठपुरावा करणे, मिलेनियम वोटर अभियानाच्या माध्यमातून नवीन वोटर्सपर्यंत पोहचून त्यांचे वोटींग कॉर्ड बनविण्यास मदत करणे, सोशल मीडिया स्वयंसेवक तयार करणे, तसेच युवा पिढीला संगटीत करून भारतीय जनता युवा मोर्चाला अंतर्गत विकास घडवून आणणे, अशा विविध बाबींवर या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली.यावेळी वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपायुवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना विविध सूचना देत त्यानुसार कामे करण्याचेही सूचति करण्यात आले.
जिल्ह्यातील भाजपायुमो कार्यकर्त्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:27 AM