राष्ट्रीय ओबीसी महासंघ : जातनिहाय जनगणना करालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी कृती समिती व ओबीसी समाजात मोडत असलेल्या सर्व जातीय संघटना यांच्या वतीने शनिवारी स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयाच्या ‘श्री-लिला’ सभागृहात सभा झाली.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ७ आॅगस्टला कॉन्स्टेट्युशन क्लब, नवी दिल्ली येथे होत आहे. या महाअधिवेशनाला जाण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. त्याबद्दल चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी बबनराव फंड होते. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक जीवतोडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, नंदू नागरकर, रावजी चवरे, संदीप गड्डमवार, दिनेश चोखारे, सुधाकर अडबाले, नरेंद्र जीवतोडे, गोविंदा बोडे, प्रा. शेषराव येलेकर, गुणेश्वर आरीकर, संजय टिकले, शाम राजूरकर, बांदुरकर, लोहे, स्वप्निल पहानपट्टे, बबनराव वानखेडे, विनायक साखरकर, दिनेश कष्टी, चरण मत्ते आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधी हजर होते. प्रास्ताविक निमंत्रक सचिन राजूरकर यांनी केले. वणी, मारेगाव, झरी जामणी येथून ही समाजबांधव आलेले होते. बैठकीचे संचालन प्रा. रवी वरारकर तर आभार गजानन कष्टी यांनी मानले.ओबीसी महासंघाच्या मागण्याया बैठकीत ओबीसी समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहीर करून, ओबीसी समाजासाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे, मंडल आयोग, नच्चीपन आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या, ओबीसी क्रिमिलेअरची लादलेली असंवैधानिक अट रद्द करण्यात यावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, ओबीसीसाठी विधानसभा व लोकसभेसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात यावा, ओबीसी शेतकऱ्यांना वनहक्क पट्ट्यासाठी लावलेली तीन पिढ्यांची अट रद्’ करण्यात यावी. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यात यावा, या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या मागण्या महाअधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
दिल्ली येथील अधिवेशनासाठी सभा
By admin | Published: June 11, 2017 12:30 AM