बल्लारपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे राष्ट्रीय ओबीसी महासंघ बल्लारपूर तालुका अध्यक्ष गणपती मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन दहेली येथे नुकतीच तालुका तालुकास्तरीय सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने १९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणे, ओबीसी समाजासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता ग्रामपंचायतला निवेदन देणे व गडचिरोली येथे २२ फेब्रुवारीला होणाऱ्या ओबीसी मोर्चात उपस्थित होण्याबाबत या सभेत राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका अध्यक्ष गणपती मोरे यांनी मार्गदर्शन केले. या सभेत सरपंच योगेश पोतराजे, विनोद मोरे, उमेश वाढई, अतुल पावडे, अजय ठावरी, चक्रधर पायपरे, सुधाकर ठेंगणे, शरद गौरकर, करण झाडे, नीतेश उरकुडे, राजू भोयर, आकाश खापणे, सूरज पावडे, योगेश डाऊले, रूपा गौरकार, मायाबाई गवाने, आयुष्य चुनारकर, अविनाश मठे, यश नारले, सूरज भोयर उपस्थित होते.