लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर येथे १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरु करण्यासाठी सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा ट्रस्ट, राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास टाटा ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी व्यंकटरमणन, सीएफओ आशिष देशपांडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचलनालयाचे डॉ. प्रवीण शिणगारे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार उपस्थित होते.कॅन्सर रुग्णालयाच्या कामासाठी चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून त्यांना येत्या १५ दिवसात निधीचे वितरण करण्यात येईल, असे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, या फाऊंडेशनमध्ये टाटा ट्रस्ट, जिल्हा खनिज विकास निधी, वैद्यकीय शिक्षण संचलनालय या तिघांचा समावेश असून तसा त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.कर्करोग रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या निधीतून १३० कोटी रुपये इमारत आणि वसतिगृहाच्या बांधकामास देण्यात येईल. टाटा ट्रस्ट ७८ कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून देत आहे. टाटा ट्रस्टने आर्किटेकची नेमणूक केली असून येत्या काही दिवसात यासंबंधीची टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि डिसेंबरमध्ये कामाचे भूमीपूजन होईल, असेही ते म्हणाले.
चंद्रपुरातील कर्करोग रुग्णालयासाठी सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:06 PM
चंद्रपूर येथे १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरु करण्यासाठी सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा ट्रस्ट, राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार