चंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाहनाचे टायर फुटून अपघाताच्या घटना घडतात. यापूर्वी अशा घटना घडल्या आहे. त्यातच यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी बाहेर पडताना प्रथम टायरमधील हवा तपासणी पाहिजे.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब वाढतो. त्यातच सिमेंट, डांबर रस्ते तापत असल्याने सातत्याने होणाऱ्या घर्षणातून कमजोर असलेले टायर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यता बाहेर पडताना टायरमधील हवा तपासून घ्यावी, दुपारच्या वेळी कामाशिवाय प्रवास करणे टाळणेच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.
दुपारी वाहन न चालविलेले बरे
सध्या तापमान वाढले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळणेच आरोग्य तसेच वाहनांसाठी गरजेचे आहे. उन्हामुळे रस्ते तापलेले असतात. अशावेळी भरधाव वेगाने वाहन चालविल्यास टायर फुटू शकतो.
उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल?
उन्हाळ्यामध्ये गाडी धावत असताना टायरमधील हवेचा दाब अचानक वाढते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. नियमितपणे हवा तपासणी पाहिजे. महिन्यातून एक दोन वेळा हायड्रोजन गॅसने वाहनात हवा भरल्यास टायर थंड राहते. शक्यतो जुने टायर वापरू नये.
टायर फुटून अपघात वाढले
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टायर फुटून अपघात वाढल्याच्या दरवर्षी घटना घडतात. विशेषत: एप्रिल, मे मध्ये याचे प्रमाण अधिक असते. सिमेंट तसेच डांबरीरस्त्यामध्ये टायरचे घर्षण होते. टायर जुने असेल तर अपघात होताे. त्यामुळे टायरमध्ये हवेचा दाव योग्य प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे.
तापमान ४४ अंशावर
यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ४४ अंशापर्यंत पोहचले आहे. सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसत आहे. त्यामुळे शक्यता कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळले पाहिजे.