शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:57 PM

चंद्रपूर जिल्हा हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असताना या जिल्ह्यात आम्ही उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहावे, यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : रामदेवबाबांच्या उपस्थितीत योग शिबिराचा प्रारंभ

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर/मूल : चंद्रपूर जिल्हा हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असताना या जिल्ह्यात आम्ही उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहावे, यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे. योगाच्या माध्यमातून निरामय आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेशसुद्धा मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.योगऋषी रामदेवबाबा यांच्या विशेष उपस्थितीत जिल्ह्यातील मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय योग चिकित्सा व ध्यान शिबिराला मंगळवारी सकाळी ६ वाजता प्रारंभ झाला. यावेळी ना. मुनगंटीवार बोलत होते. तीन दिवस चालणाºया या शिबिराचे उद्घाटन राबदेवबाबा यांच्या हस्ते झाले. यावेळी रामदेवबाबा म्हणाले, देशाच्या बाहेर गेलेला काळा पैसा आणण्यासाठी केंद्रातील मंत्री तत्पर आहेत. देशाच्या बाहेर काळा पैसा गेलेला आहे. तो आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे. आम्हाला समाधान आहे. मोदीजींचे नेतृत्व चांगले आहे, चांगल्या विचाराने कार्य करीत आहेत. देश खूप मोठा आहे, त्यामुळे एकदम बदल होत नसले तरी लहान-लहान बदलातून एक मोठा बदल देशात होत आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठ्या पायाभुत सुविधांवर काम करीत आहे. केंद्राची उज्वल योजना ही गरिबातील गरिबापर्यंत पोहचलेली योजना आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पतंजलीचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर उपस्थित होते.पालकमंत्र्यांसह हजारोंनी घेतले धडेया योग शिबिराच्या पहिल्याच दिवशी राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: सकाळी ६ वाजता उपस्थित राहून योगाचे धडे घेतले. रामदेवबाबांनी करून दाखविलेली विविध आसने त्यांनीही केली. त्यांच्यासोबत हजारो नागरिकांनीही योगाभ्यास केला. यावेळी पतंजली योग समितीचे विष्णू भुतडा यांनी योगाचे महत्त्व विषद केले. या योग शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.योगमय आणि उत्साहवर्धक वातावरणमूल येथे आयोजित तीन दिवशीय योग शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यातून नागरिक योगाचे धडे गिरविण्यासाठी आले आहेत. आजुबाजुच्या खेड्यातील लोक पहाटेच मूलमध्ये दाखल होऊन योगस्थळी उपस्थित राहत आहेत. शहरात ठिकठिकाणी योगाची आसने दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत. चौकाचौकात, चहाटपरीवर योगांची माहिती आणि त्याचे फायदे, याचीच चर्चा आहे. एकूणच मूल शहरात सध्या योगमय व उत्साहवर्धक वातावरण तयार झाले आहे.आज चंद्रपुरात महिला महासंमेलनचंद्रपूर : महिला पतंजली योग समितीच्या वतीने २१ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता चांदा क्लब ग्राऊंडवर महलिा महासंमेलनाचे आयोजन केले आहे. यावेळी योगगुरु रामदेवबाबा, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याच्या ग्राम विकास, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत.