शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

२० वर्षांच्या कृतीतून दिले राष्ट्रसंताच्या संदेशाला मूर्तरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 1:02 PM

Chandrapur News Rashtrasant Tukdoji Maharaj राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलेला हा संदेश निवृत्त प्रा. निलकंठ बापूराव लोणबले यांनी कृतीत उरवून दाखवला. मागील २० वर्षांपासून श्रमदान करून तपोभूमीला पाणीदार केले.

ठळक मुद्देतपोभूमीसह गावकऱ्यांवरील जलसंकट टळलेनिवृत्त प्राध्यापकाचे श्रमदान सार्थकी

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एक हात खोदावी जमीन, हे पुजनाहूनही पूजन, प्रभाव तयाचा अधिक, शेकडो व्याख्यानाहुनही... राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलेला हा संदेश निवृत्त प्रा. निलकंठ बापूराव लोणबले यांनी कृतीत उरवून दाखवला. मागील २० वर्षांपासून श्रमदान करून तपोभूमीला पाणीदार केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेल्या गोंदोडा (गुंफा) येथील मूळ रहिवासी प्रा. निलकंठ लोणबले हे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे सेवारत होते. त्यांनी एक हेक्टर खडकाळ जागेत सलग समतल चर खोदला. कुठला मोबदला व सन्मानाची अपेक्षा न करता आपल्या गावाची व तपोभूमीचे जलसंकट दूर करण्यासाठी दररोज सकाळी-संध्याकाळी दोन तास व सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी श्रमदान केले.

राष्ट्रसंतांच्या तपोभूमीला पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी २० वर्षांपासून स्वत: राबत आहेत. त्यांनी एक हेक्टर खडकाच्या जागेत समतल चर खोदला. आरमोरी येथे प्राध्यापक असतानाही नित्यनेमाने गावासाठी ते श्रमदान करत होते. अनेकांनी त्यांची टर उडवली. मात्र ते ध्येयापासून अंतरले नाही. प्रा. लोणबले यांची निष्ठा पाहून गावातील नागरिक तसेच गुरूभक्तांनीही श्रमदान व आर्थिक मदत करू लागले. परिणामी, या ध्येयवादी प्राध्यापकाच्या कृतीतून सुरू झालेल्या काम उपयुक्त ठरले. पाण्याची समस्या कायमची दूर झाली आहे. यासाठी सुधाकर चौधरी, देवराव धारणे, संजय धारणे, चंद्रभान बारेकर, मुरलीधर शेंडे, अनिल गुरनुले, प्रभू धारने यांनी सुरूवातीपासून साथ दिली. त्यामुळे सुरू केलेल्या कामाचे फलित झाले. गावात व तपोभूमीत पाण्याची गंगा वाहू लागली, या शब्दात प्रा. लोनबले यांनी आनंद व्यक्त केला.१६ पाझर तलावांची निर्मितीतपोभूमी गोंदोडा (गुंफा) परिसरात होलिका बांध, श्रमसंस्कार बांध, गीताचार्य तुकारामदादा बांध, स्मृती बांधासह सन २००२ पासून सूक्ष्म पाणी व्यवस्थापनाद्वारे १६ पाझर तलाव निर्माण करण्यात आले. २००७ पासून शताब्दी बांधाचे काम श्रमदानातून ५० टक्के पूर्ण झाले आहे सद्यस्थितीत २० फूट खोल व एक हेक्टर जागेत शताब्दी बांधाचा विस्तार झाला. यातही मुबलक जलसाठा आहे.श्रमदानातून दिनचर्याप्रा. नीलकंठ लोणबले यांनी स्वत:पासून सुरू केलेल्या श्रमदानाच्या प्रेरणमुळे आता गोंदोडा येथील गावकरी युवक तसेच नवरगाव, वाघेदा, केवाडा, मदनापूर, विहिरगाव आदी गावातील नागरिक, युवक, महिला श्रमदान करू लागले आहेत.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज