गावातच रोजगार उपलब्ध : अनेकांच्या हाताला मिळाले कामनागभीड : तालुक्यात मिरचीचे पीक नसले तरी या पिकामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मिरचीच्या सातऱ्या तालुक्यात करण्यात येत आहेत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर थांबले आहे.नागभीड तालुक्यात उद्योगाची वानवा आहे. नागभीड परिसरात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली आहे. त्याकरिता जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. परंतु संपूर्ण तालुक्यात एकही मध्यम किंवा मोठा उद्योग नाही. तेथे कवेळ दाल मिल आणि राईस मिल पलीकडे दुसरा उद्योग नाही. तालुक्याचे प्रमुख पीक धान आहे. या पिकाच्या संवर्धानासाठी सिंचनाची कोणतीच व्यवस्था नसल्याने या पिकाला दरवर्षी नैसर्गिक पावसावर अवलंबून राहावे लागते. त्याच वेळी निसर्ग नेहमीच दगा देत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. गत २०-२५ वर्षांपासून दुष्काळी स्थिती उद्भवत असल्याने तालुक्याील मजूर आणि काही शेतकरीही रोजगार मिळविण्यासाठी नजीकच्या नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात स्थलांतर करीत होते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यामध्ये मिरच्या साफ करण्याचे सातरे सुरू करण्यात आले आहेत. तेथे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. दोन-तीन वर्षांपासून कानपा, बाह्मणी येथे सुरू झालेल्या सातऱ्यांना मजुरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आता हे सातरे जेथे-जेथे मजूर उपलब्ध होत आहेत, त्या-त्या परिसरात सुरू होत आहेत. तध्ये हे सातरे तालुक्यातील कानपा, मोहाळी, बाह्मणी, नवखळा, भिकेश्वर, कोर्धा, नवेगाव पांड आदी गावांमध्ये सुरू झाले आहेत. हे काम शरीराला नुकसानकारक असले तरी तालुक्यात रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने नाईलाजास्तव सातऱ्याचे काम केले जात आहे. एका सातऱ्यावर १५० ते २०० मजूर कार्यरत आहेत. त्यांनी साफ केलेली मिरची आंध्र प्रदेशातील कंत्राटदारांकडून उपलब्ध होते. या मिरचीच्या मुक्या काढल्या जातात. त्याकरिता एका पोत्यामागे मिरची सफाईसाठी ठराविक रक्कम दिली जाते. (तालुका प्रतिनिधी)शासकीय यंत्रणा रोजगारात अपयशीरोजगारापासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता केंद्र व राज्य सरकारे राष्ट्रीय आणि मुख्यमंत्री ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. त्यामध्ये १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात काही अपवाद वगळता रोजगार उपलब्ध करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. रोजगाराअभावी मजुरांना मिरचीच्या सातऱ्याचे जोखमीचे काम करावे लागत आहे. विद्युत अपघाताने सातरा जळालाचालू पंधरवड्यात भिकेश्वर येथे मिरची सातऱ्यावर विद्युत तार तुटून पडली. त्यामुळे मिरचीचा सातरा जळून खाक झाला. तेथील मिरची जळाल्याने परिसरातील वातावरण श्वास घेण्यायोग्य नव्हते. अनेक सातरे अशा धोकादायक ठिकाणी तयार करण्यात आली आहेत. ती सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक आहे. त्यामुळे भिकेश्वरप्रमाणे अपघात घडणार नाहीत.
मिरची सातऱ्यामुळे मजुरांचे स्थलांतर थांबले
By admin | Published: April 14, 2017 12:47 AM