वरोरा : वरोरा बार असोसिएशनची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत ॲड. मिलिंद देशपांडे हे अध्यक्षपदी निवडून आले.
मागील अनेक वर्षांपासून अधिवक्ता संघाची निवडणूक घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. वरिष्ठ अधिवक्ता आणि नव्याने रुजू झालेले अधिवक्ता यांच्यातील चुरस असे चित्र या निवडणुकीत पहायला मिळाले.
यात सचिवपदी बी.एस. लोया, उपाध्यक्ष म्हणून ए .एस. देवतळे तर सहसचिवपदी पी. ए .झाडे या अधिवक्ता त्यांची निवड झाली. कोषाध्यक्षपदी दीपिका ठावरी या निवडून आल्या तर कार्यकारिणी सदस्य म्हणून राकेश गेडाम, व्ही आर कीडमबी, वैभव बोधाने आणि उज्ज्वला खानेकर यांची निवड अविरोध झाली.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. नितीन पाटील व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. राजू जांभळे यांनी काम पाहिले. एकूण ६४ अधिवक्त्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला.