शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सैनिकी शाळेचे अपूर्ण काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:00 AM

सैनिकी शाळा हा आ. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. सैनिक शाळेसह मतदार संघातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण व्हावी, यासाठी प्रकल्पांना भेटी देत पाहणी करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी सैनिकी शाळेला भेट दिली. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी या शाळेत पुतळेदेखील उभे राहत आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांचे निर्देश । चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला आकस्मिक भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावरील सैनिकी शाळेला शुक्रवारी भेट देत पाहणी केली. या सैनिकी शाळेतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या व त्या दृष्टीने युध्द पातळीवर काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात भारत सरकारचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लवकरच आपण भेट घेणार असून सैन्य दलाच्या माध्यमातून लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या भेटीदरम्यान दिले.सैनिकी शाळा हा आ. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. सैनिक शाळेसह मतदार संघातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण व्हावी, यासाठी प्रकल्पांना भेटी देत पाहणी करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी सैनिकी शाळेला भेट दिली.देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी या शाळेत पुतळेदेखील उभे राहत आहेत. सभागृहामध्ये कारगिल युद्ध, भारताचे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकाचे थ्री डायमेन्शन माहितीपट दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ वस्तू याठिकाणी दर्शनी ठेवण्यात आल्या आहेत. सैनिकी शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत ही चंद्रपूरच्या किल्ल्याप्रमाणे आहे. मैदान हे आॅलिम्पिक दर्जाचे आहे. एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टँक पासून तर सर्व सुविधा या भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे आहेत.सदर सैनिकी शाळेत मुलींना वर्ग सहावीकरिता प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा हा निर्णय देशातील फक्त दोन शाळांकरिताच घेण्यात आला असून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिक शाळेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वर्ष २०२० करिता मुलींना सैनिकी शिक्षण मिळण्याविण्याची दारे खुली झाली आहे. पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूर येथील सैनिकी शाळेपासून ही सुरूवात होत आहे. सैनिक शाळेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुत्यालवार, सैनिकी शाळेच्या उपप्राचार्या कॅप्टन अनमोल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.१२३ एकरात शाळेची वास्तूसुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयापैकी प्रमुख निर्णय म्हणजे चंद्रपूरची सैनिकी शाळा. भारतात आजमितीला असणाºया २६ सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये पूर्ण झाली आहे. पहिली ६ व्या वगार्ची तुकडी जून २०१९ पासून दाखल झाली आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल, अशा शुभेच्छा लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या माध्यमातूनच आ. मुनगंटीवार यांना सैनिकी शाळेच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली आहे. चंद्रपूर व बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंड जवळील १२३ एकरांमधील सैनिकी शाळेची वास्तू पूर्णत्वास आली आहे. या सैनिकी शाळेमध्ये भारतातील अद्ययावत असे सैनिकी संग्रहालय देखील आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महू या ठिकाणी असलेल्या सैनिकी संग्रहालयापेक्षा अधिक उत्तम हे संग्रहालय आहे. ताडोबाच्या पर्यटकांना सैनिकी शाळेच्या दर्शनी भागांमध्ये भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निरीक्षण कक्षातून या संपूर्ण शाळेचे कॅम्पस बघता येते. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार