आंबोली येथील संजय महादेव लाखडे यांची आंबोली परिसरात शेती आहे. या शेतीत त्यांनी गोठा बांधलेला आहे. या गोठ्यातच त्यांनी शेती उपयोगी साहित्य व बैल बांधलेले होते. गुरुवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला तर गोठ्यात बांधलेल्या बैलाचा दावा जळाल्याने बैल मुक्त झाला. त्यामुळे तो तिथून बाहेर निघाला; परंतु गोठ्यात असलेले स्प्रिंकलरचे ३० पाइप, डिझेल इंजिन, करंट मशीन, सात हजार रुपयांचे रासायनिक खत, पाच हजार रुपयांचे फवारणी औषध व शेती उपयोगी साहित्य, असे जवळपास दोन लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती शंकरपूर पोलीस चौकी व तलाठी गराटे यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे.
आगीत गोठा जळून लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:31 AM