ॲग्रो फ्रुट्स इंडिया प्रा.लि. कंपनीच्या डायरेक्टर व आरोपींनी संगनमत करून सांगली येथे सेमिनार घेऊन शेळीपालन उद्योगात नोकरी देतो, असे आमिष देऊन चंद्रपूर येथील ब्रँच ऑफिसमध्ये फिर्यादीकडून दहा लाख पाच हजार रुपये व इतर फिर्यादींकडून नगद व शेळ्या असे एकूण २८ लाख रुपये घेतले. मात्र नोकरी दिली नाही. याबाबतची तक्रार तुमसर पोलीस निरीक्षक रवींद्र शेटे तर्फे संतोष सिदने यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिली. त्याआधारे चार जणांवर ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करून दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे. जागृती ॲग्रो फ्रुट्स इंडिया प्रा. लि. या कंपनीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविलेले आहेत, त्यांच्या ठेवी परत मिळविण्याकरिता अर्ज भरून द्यायचे आहेत. गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
नोकरीचे आमिष दाखवून लाखोंनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:24 AM