हंसराज अहीर : श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व जोपासणे आवश्यकचंद्रपूर : श्रमिकांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी व राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.ना. अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती, गोल बाजार व गंजवार्ड येथील श्रमिक बांधवांचा सोमवारी भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, भाजपा नेते माजी नगराध्यक्ष विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेश मून, मनपा गटनेते अनिल फुलझेले, आदींसह सत्कारमूर्ती श्रमिक बांधवांची उपस्थिती होती.देशाच्या प्रगतीमध्ये श्रमिकांचा सदैव सिंहाचा वाटा राहिला आहे. घाम गाळून या श्रमिकांनी विविध क्षेत्रात आपल्या श्रमाला प्रतिष्ठा व सन्मान प्राप्त व्हावे, हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून ‘श्रमेय जयते’ असा नारा देत त्यांनी श्रमिकांच्या उत्थानासाठी विशेषत्वाने कार्य सुरू केले आहे. आज या श्रमिक बांधवांसोबत काही क्षण घालवितानाचा आनंद अवर्णनिय आहे. त्यांचा सत्कार करताना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. असा समारंभ प्रथमच पार पडला.(नगर प्रतिनिधी)
मंत्र्यांनी केला कामगारांचा सत्कार
By admin | Published: November 09, 2016 2:09 AM