लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंड राजांनी उभारलेल्या महाकाली मंदिर परिसरात शेकडो वर्षांपासून चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविकांना चंद्रपूरात आणण्याची परंपरा १८६० च्या कालखंडामध्ये यमुनामायने सुरू केली. मात्र मंदिर व्यवस्थापन कमिटीकडून भाविकांना सुविधा पुरविली जात नाही, अशी खंत यमुनामायच्या वंशजांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली. ‘यमुनामायच्या धाडसाने चंद्रपूरवारी’ या शिषर्काखाली शुक्रवारी वृत्त प्र्रकाशित होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी वंशजांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.नांदेड जिल्ह्यातील शेलगाव ते चंद्रपूर असा ४५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून १८६० मध्ये यमुनामाय शेकडो भाविकांसह माता महाकाली दर्शनासाठी चंद्रपूरात दाखल झाल्या होत्या.तेव्हापासून हयात असेपर्यंत यात्रेची वारी सुरू ठेवली. ही परंपरा आजही सुरू आहे. राणी हिराईने महाकाली मंदिराची व्याप्ती वाढली. राणीच्या धार्मिक व सामाजिक कार्याने महाकाली यात्रेचे महत्त्व वाढले. यमुनामायच्या निधनानंतर हा वारसा त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. यमुनामायचे वंशज माधव नरबाजी उट्टलवाड, गोविंद महाराज माधव, नरहरी माधव, सुनील माधव, सुनील गोविंद, अनिल गोविंद दरवर्षी शेकडो भाविकांसह महाकाली यात्रेत येतात.१८ व्या शतकातील यमुनामायच्या स्मृती कायम राहावी, म्हणून यात्रेची वारी केली जात आहे. ‘यमुनामाय’ याच नावाने हा वारसा पुढे नेला जात आहे. हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रेसाठी येतात. यात्रेकरूंची गैरसोय होते, अशी खंत गोविंद महाराज यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’ ने या समस्येला वाचा फोडली. दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी आज महाकाली मंदिराच्या परिसरात दाखल झाले. यमुनामायच्या वंशज ९५ वर्षीय यमुनामाय, गोविंद महाराज व उट्टलवाड कुटुंबीयांची भेट घेवून १८ व्या शतकातील ऐतिहासिक संदर्भ जाणून घेतले.भाविकांच्या मूलभूत समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी ना. अहीर म्हणाले, माता महाकालीच्या दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविक येतात. त्यामुळे यात्रेला कीर्ती मिळाली.पुढील वर्षी चैत्र पौर्णिमेच्या यात्रेदरम्यान मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ. शिवाय, यमुनामायच्या वंशजांचा हीसन्मान कायम ठेवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.अनेक वर्षांपासून महाकाली देवीच्या दर्शनासाठी आम्ही येत आहोत. यमुनामायचे वंशज म्हणून आम्हाला विशेष वागणूक नको. परंतु भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनाने सोयीसुविधा पुरविल्या पाहिजे. आमची व्यथा ‘लोकमत’ ने मांडली. त्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी यात्रा परिसरात येऊन समस्या जाणून घेतल्या. हा क्षण कायम स्मरणात राहणारा आहे.- गोविंद महाराजयमुनामायचे वंशज, नांदेड
यमुनामायच्या वंशजांची मंत्र्यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:52 PM
गोंड राजांनी उभारलेल्या महाकाली मंदिर परिसरात शेकडो वर्षांपासून चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविकांना चंद्रपूरात आणण्याची परंपरा १८६० च्या कालखंडामध्ये यमुनामायने सुरू केली.
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल : महाकाली यात्रेतील भाविकांना सुविधा पुरविण्याची ग्वाही