मूल : कोरोनाकाळात उद्ध्वस्त झालेल्या आणि आर्थिक झळ पोहोचलेल्या मूल तालुक्यातील सुमारे १५० कुटुंबीयांना महारोगी सेवा समिती वरोराच्यावतीने मिशन आनंद सहयोग या उपक्रमांतर्गत जीवनाश्यक वस्तूंच्या किटचे वाटप मूल येथील नवभारत कन्या विद्यालयात शुक्रवारी करण्यात आले.
कार्यक्रमाला महारोगी सेवा समितीचे पदाधिकारी रवींद्र नलगठीवार, इकराम पटेल, शौकत खान, उमेश घुलवसे, अश्विनी आंदळकर, झाबिया खान, नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगला सुंकरवार, विजय सिद्धावार, मंगेश पोटवार, पत्रकार भोजराज गोवर्धन, अमित राऊत, राजू सूत्रपवार आदी उपस्थित होते.
मूल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शोध विचार वेध बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गौरव श्यामकुळे यांनी महारोगी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मूल तालुक्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना मिशन आनंद सहयोग या उपक्रमाचा लाभ देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने मूल येथे ३० वस्तू असलेल्या जीवनाश्यक वस्तूंच्या किटचे सुमारे १५० कुटुंबीयांना वाटप करण्यात आले.