लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : योग्य मार्गदर्शन व जीवन जगण्यासाठी कौशल्य विकसित केल्यास गुन्हेगारी वृत्तीला निश्चितपणे आळा बसू शकते. मुख्य समाज प्रवाहात येऊन स्वाभिमानाने जगता येते. याच उद्देशाने जिल्ह्यात ‘मिशन परिवर्तन’ ही मोहीम राबविण्यात येत असून दिशादर्शक ठरत आहे, असे प्रतिपाद पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेडमध्ये पार पडलेल्या जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.‘मिशन परिवर्तन’ योजनेची सुरुवात केली जात आहे. या कार्यक्रमाकरिता गुन्हा दाखल झालेले दारूविक्रेते तसेच त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले होते. या योजनेतून गुन्हेगारी प्रवृत्ती संपुष्ठात आणण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. प्रत्येकाने या संधीचा लाभ घेवून स्वत: व आपल्या कुटुंबीयाचे भविष्य घडवावे. स्वाभिमानाने जीवन जगावे, यावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रमुख मार्गदर्शक किशोर के., जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक भय्याजी येरमे उपस्थित होते.किशोर के. यांनी दारूच्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. रवींद्र खडसे व स्टेट बँक आॅफ इंडियाचे वित्त विभागीय व्यवस्थापक विजय चितळे यांनी लघु उद्योगाला आवश्यक असणारी साधनसामग्री व त्याकरिता आवश्यक असलेली व्यवसाय कर्ज योजना याविषयी मार्गदर्शन केले.अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनीही विचार मांडले.गुन्हेगारी वृत्ती कायमची नष्ट होऊ शकते, याकरिता संबंधित व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मिशन परिवर्तनाच्या माध्यमातून गुन्हेगारी वृत्तीला निश्चितपणे आळा बसू शकेल, असा आशावाद मुख्य कार्यपालन अधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, रामनगरचे ठाणेदार अशोक कोळी चंद्रपूर शहरचे भगत यांनीही अभियानाचे महत्त्व विषद केले. विपरित परिस्थितीतही व्यक्तीने माणुसकीवर विश्वास ठेवून आयुष्य जगण्याची शिकवण या कार्यक्रमामुळे मिळाली.सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कारपोलीस मुख्यालय परिसरात जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त सभासद व पोलिसांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारोह उत्साहात पार पडला. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी पोलीस पाल्यांना करिअरबद्दल मार्गदर्शन केले. चंद्रपूर पोलीस विभागात रूजू झाल्यापासून ते सेवानिवृत्तीपर्यंत जे पोलीस कर्मचारी या पतसंस्थेत सहभागी झाले होते. त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक (गृह) मारुती इंगवले, पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक बोडे, सचिव प्रकाश खुटेमाटे, संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस पतसंस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती याप्रसंगी देण्यात आली. संचालन विष्णू नागरगोजे यांनी केले. विकास आलाम यांनी आभार मानले.
मिशन परिवर्तन देणार जीवनाला दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:22 AM
योग्य मार्गदर्शन व जीवन जगण्यासाठी कौशल्य विकसित केल्यास गुन्हेगारी वृत्तीला निश्चितपणे आळा बसू शकते. मुख्य समाज प्रवाहात येऊन स्वाभिमानाने जगता येते. याच उद्देशाने जिल्ह्यात ‘मिशन परिवर्तन’ ही मोहीम राबविण्यात येत असून दिशादर्शक ठरत आहे, असे प्रतिपाद पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.
ठळक मुद्देमहेश्वर रेड्डी : पोलीस मुख्यालयात विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती