लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा ते करनूल (तेलंगणा) व वरोरा ते राजनांदगाव (छत्तीसगढ) ७६५ के.व्ही.डी.सी. ट्रॉन्समिशन लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई देण्यात यावी, यासाठी शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी गुरुवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह मुंडण करून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनात आ. बाळू धानोरकर यांच्यासह प्रवीण बांधूरकर, वासुदेव ठाकरे, दुर्वास हेपट, संदीप लोहे, देवानंद, मोरे, पुरुषोत्तम पावडे, पद्माकर, कडुकर, गोपाल सातपुते व किशोर राजुरकर या शेतकऱ्यांसह शिवसेनेचे रमेश तिवारी, अनिल धानोरकर, रमेश देशमुख, सोहेल शेख, राजेश नायडू, सिद्दी यादव, मनोज पाल, प्रमोद मगरे, भारती दुधाने सहभागी झालेले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या टॉवर लाईन कामाच्या सद्यस्थितीबाबत २१ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीत उपविभागीय अधिकारी समितीकडून मुल्यांकन करून संबंधित शेतकऱ्यांना जागेचा अंदाजित मोबदला देण्याचे ठरले होते. या बैठकीच्या कार्यवृत्ताला केराची टोपली दाखविल्याचा आरोप वरोराचे आ. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी यावेळी केला.वरोरा पॉवर ग्रीड ट्रॉन्समिशन लिमिटेड या कंपनीच्या अखत्यारीत सिम्प्लेक्स, गॅमन, व बजाज या कंपन्या टॉवर उभारणीेचे व तार ओढण्याचे काम करीत आहेत. शेतीमधून जाणाऱ्या या लाईनचा वापर वाणिज्य वापरासाठी होत असल्यामुळे संबंधित शेतकºयांना याचा मोबदला ३१ मे २०१७ च्या जीआरनुसार तसेच नोंदणी महानिरीक्षक (आ.जी.आर.) च्या निर्देशानुसार संभाव्य अकृषक वाणिज्याचा दर आकारण्यात यावा. टॉवरमध्ये व लाईनमध्ये एकापेक्षा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्यामुळे सदर जमिनीचा उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयामार्फत अति तातडीच्या मोजणीचे पैसे भरून मोजणी करून शेतकºयांना योग्य मोबदला देण्यात येत आहे. यात कुठेही हयगय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. या संदर्भात माहिती देण्यात आली. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी केल्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ झाली.हे सर्व विषय चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात होणाºया पॉवर ग्रीडच्या टॉवर लाईनवर लागू करण्यात आलेले आहे. तसेच पॉवर ग्रीड तथा इतर कंपन्यांमार्फत उभारण्यात टॉवरचे बांधकाम वा टॉवरची उभारणी करीत असताना शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असते. तसेच शेजारच्याही शेतकºयांचे नुकसान होत असते. सदर शेतकऱ्यांना देखील शेतपिकाचा योग्य मोबदिला देण्याचेदेखील कंपनीने मान्य केले. अशा सर्व बाधित शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली काढून मोबदला निश्चित करून आपल्या स्तरावर मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आ. बाळू धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मागणीकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तिव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.टॉवर उभारणीच्या वेळेस पिकांचे नुकसानलाईन ओढताना (दोन लाईनच्या मधील) पिकांचे नुकसानलाईन व टॉवरमधील कॉरीडोअरच्या मध्ये येणाऱ्या झाडांचे नुकसानफाउंडेशनच्या जमिनीचे पैसे ३१ मार्च २०१७ च्या जी. आर. नुसार खोदकाम केलेल्या जागेचा मोजमाप करून मोबदला देण्यात यावा.दोन लाईनमधील जागेचे पैसे दि. ३१ मार्च २०१७ नुसार देण्यात यावे.चुकीच्या जागेवर टॉवर फाऊंडेशन झाले अशा शेतकºयांना मोबदला द्यावा.खोदकाम करीत असताना जनावरे मृत्यूमुखी पडलेल्यांना मोबदला देण्यात यावा.
शेतकऱ्यांसह आमदारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:08 PM
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा ते करनूल (तेलंगणा) व वरोरा ते राजनांदगाव (छत्तीसगढ) ७६५ के.व्ही.डी.सी. ट्रॉन्समिशन लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई देण्यात यावी, यासाठी शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी गुरुवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह मुंडण करून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनात आ. बाळू धानोरकर यांच्यासह प्रवीण बांधूरकर, वासुदेव ठाकरे, ...
ठळक मुद्देटॉवरच्या मोबदल्याचा प्रश्न : न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा निर्धार