लोकसहभाग : केंद्र सरकारच्या अभियानाची अंमलबजावणीचंद्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने शहरात १ ते १५ जुलै यादरम्यान निवासी संकूल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात लोकसहभागासह मनपाचे कर्मचारी सहभागी झाले होते.महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक पंधरवाड्यात एक संकल्पना निवडून त्याप्रमाणे १ ते १५ जुलैदरम्यान निवासी संकूल स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी करण्याचे कळविले आहे. त्यानुसार झोन क्र. १ (ब) अंतर्गत तुकूम तलाव प्रभाग क्र. २ मध्ये उपगन्लावार लेआऊटमध्ये राजविलास अपार्टमेंट, आनंदसागर अपार्टमेंट, गुरूदत्त संकूल अपार्टमेंट गृहनिर्माण संस्था या परिसरात विशेष स्वच्छता मोहिम घेण्यात आली. उपस्थित नागरिकांना मनपाचे उपायुक्त डॉ. विजय इंगोले यांनी सदर मोहिमेचे महत्त्व समजावून स्वच्छतेची शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर मोहिमेत मनपाचे ४० कर्मचारी तसेच प्रभागातील ५० नागरिकांनी उपस्थित राहून श्रमदान केलेले आहे.उपरोक्त मोहिमेत झोन क्र. १ चे प्रभाग सभापती देवानंद वाढई, प्रभागाचे सदस्य रवी गुरूनुले, रत्नमाला वायकर यांचेसह सदस्य अंजली घोटेकर, मनपाचे लेखाधिकारी गायकवाड, नगर रचनाकार सगरे, क्षेत्रिय अधिकारी नामदेव राऊत, अभियंता घुमडे, झोनचे स्वच्छता निरीक्षक उदय मैलारपवार, महेंद्र हजारे, प्रदीप मडावी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मनपाचे विशेष स्वच्छता अभियान
By admin | Published: July 17, 2016 12:45 AM