शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

राज ठाकरे यांनी हाॅटेल बाहेर निदर्शने करणाऱ्या महिलांची ऐकली गाऱ्हाणी

By राजेश भोजेकर | Published: September 20, 2022 4:58 PM

पक्ष संघटनेत मोठ्या बदलाचे संकेत, पक्ष संघटन मजबूत करण्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चंद्रपूरचा मुक्कामी दौरा आटोपून मंगळवारी दुपारी ३ वाजता अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. येथून जाण्यापूर्वी मुक्कामी असलेल्या हाॅटेलसमोर कलकम कंपनीत गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये अडकून पडल्याने अडचणीत आलेल्या महिलांनी जोरदार निदर्शने करीत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी ठिय्या दिला. ठाकरे यांनी जाता जाता या महिलांची भेट घेत त्यांची गाऱ्हाणी ऐकली. ही समस्या प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या आश्वासनाने आंदोलनकर्त्या महिलाही समाधानी झाल्या.

उद्योजकांच्या समस्यांवर मुनगंटीवारांशी चर्चा करणारराज ठाकरे हे सोमवारी सायंकाळी चंद्रपूरात दाखल झाले. या नंतर रात्री येथे मुक्काम केला. आज सकाळी त्यांनी चंद्रपूरातील वकिल, उद्योजक, व्यापारी वर्गासोबत हाॅटेलातच चर्चा केल्यात. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची संख्या अधिक आहे. यापुढे प्रदूषण न करणारे इलेक्ट्रीकल्स, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, टेक्सटाईल्स पार्क यासारखे उद्योग येणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा उद्योजकांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. औष्णिक केद्रे, कोळसा कंपन्या आणि सिमेंट उद्योगांकडून लघू उद्योगांना सहकार्य मिळत नसल्याची बाबही लक्षात आणून दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातून उपजिविकेसाठी होणारे तरुणांचे स्थलांतर थांबवावे, याकेही राज ठाकरे यांचे लक्ष वेधण्यात आले. हे सर्व विषय प्राधान्यक्रमाने मार्गी लावणार आहे. याबाबत जिल्ह्याचे नेते ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे सांगून ठाकरे यांनी उद्योजकांना आश्वस्त केले. यावेळी चंद्रपूर एमआयडीचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा, उपाध्यक्ष प्रदीप बुक्कावार, सचिव राजेंद्र चौबल व उत्तमकुमार डाखरे, संकेत वाघ, रविंद्र सातपुते हे सदस्य उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांचा ‘मनसे’दमसकाळी ११ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हाॅटेलातच बैठक घेतली. जिल्ह्यात पक्षात काय सुरू आहे. याचा अभ्यास करूनच ते आले होते. यापुढे जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर प्रत्येकांचा भर असला पाहिजे. पक्षकार्याकडे कोणी दुर्लक्ष करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा दमही ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची असलेली प्रतिमा राज ठाकरे यांना अपेक्षित नसल्याची बाब त्यांच्या बोलण्यातून जाणवत असल्याची चर्चा होती. भविष्यात पक्षात मोठे बदल दिसतील, अशी कुजबूज यावेळी कार्यकर्त्यांत होती.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे