शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

हाजी हत्या प्रकरणातील १४ आरोपींवर 'मोक्का'; एसडीपीओंच्या प्रस्तावावर महानिरीक्षकांचा शिक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 1:49 PM

Chandrapur : चौदावा आरोपी किशोर चानोरे हा अद्यापही फरार

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपुरातील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या हत्याप्रकरणातील १४ आरोपींवर चंद्रपूर पोलिसांनी 'मोक्का' अंतर्गत कारवाई केली आहे. या वर्षातील जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. या प्रकरणातील १३ आरोपी हे वेगवेगळ्या कारागृहात असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

प्रमोद मधुकर वेळोकर, ऊर्फ राजू भगवान वेरूळकर ऊर्फ समीर शेख सरवर (वय ४२) रा. दिग्रस जि. यवतमाळ, नीलेश ऊर्फ पिंटू नामदेवराव ढगे (३६) रा. नंदनवन, नागपूर, श्रीकांत अशोक कदम (३२) रा. दिग्रस जि. यवतमाळ, प्रशांत ऊर्फ परसी राजेंद्र मालवेनी (२७) रा. नकोडा, घुग्घुस, राजेश रमेश मुलकलवार (२५) रा. नकोडा, घुग्घुस, सुरेंद्रकुमार रामपती यादव (३६) रा. नंदनवन नागपूर, अक्षय मारोती रत्ने (२८) रा. नाकोडा घुग्घुस, मोहसिन नसीर शेख (३५) रा. जलनगर चंद्रपूर, अभिजित ऊर्फ पवन मोरेश्वर कटारे (३५) रा. जलनगर, चंद्रपूर, शेख नसिफ शेख रशीद (३३) रा. जलनगर, चंद्रपूर, अखिल जमिल कुरेशी (३६) रा. रहमतनगर चंद्रपूर, नूर अहमद अब्दुल वहाब कुरेशी (३६) रा. रहमतनगर, सय्यद अबरार इंतसार अहमद (३९) रा. घुग्घुस, तर फरार आरोपी किशोर चानोरे, रा. किष्णानगर नंदनवन नागपूर असे मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नाव आहेत.

चंद्रपुरातील कुख्यात गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर याची १२ ऑगस्ट रोजी हत्या केली होती. चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना आरोपींवर कलम १०३ (१), १०९ (१), १८९ (२), १८९ (४), १९१ (२), १९१ (३), १९० भारतीय न्याय संहिताअन्वये गुन्हा दाखल करून १४ पैकी १३ आरोपींना अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास करताना उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी १४ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अन्वये कारवाई करण्याकरिता पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यामार्फत नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. मंजुरी मिळाल्यानंतर मोका लावण्यात आला. या प्रकरणाचा तपास आता अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू करणार आहेत. 

एका आरोपीचा पोलिसांना गुंगारा हाजी सरवरच्या हत्याप्रकरणात १४ जणांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. चौदाही आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तत्परता दाखवत पोलिसांनी लगेच १३ आरोपींना अटक केली असली तरीही या प्रकरणातील चौदावा आरोपी किशोर चानोरे हा अद्यापही फरार आहे. मागील अडीच महिन्यांपासून तो पोलिसांना तुरी देत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर