शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सोमवार ठरला ‘आंदोलन’वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:08 AM

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वेकोलिमध्ये कार्यरत खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याविरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षकांनी सोमवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तिथे दिवसभर धरणे दिले.चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, माजरी, वणी नार्थ येथील हजारो सुरक्षा कर्मचारी सोमवारी सकाळी १० वाजता गांधी चौकात एकत्र आले. येथूून ...

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : मोर्चा, धरणे आणि हल्लाबोलखासगी सुरक्षा रक्षकांची धडकधरणे आंदोलन : वेकोलिविरोधात जोरदार नारेबाजी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वेकोलिमध्ये कार्यरत खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याविरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षकांनी सोमवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तिथे दिवसभर धरणे दिले.चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, माजरी, वणी नार्थ येथील हजारो सुरक्षा कर्मचारी सोमवारी सकाळी १० वाजता गांधी चौकात एकत्र आले. येथूून मोर्चा काढण्यात आला. जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक या मार्गाने मोर्चा निघाला. यावेळी वेकोलिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तिथे एक मंडप उभारून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कुटुंबही सहभागी झाले होते. त्यानंतर एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले. शिवसेनेचे किशोर जोरगेवार मोर्चात सहभागी झाले होते.हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची पाळीवेकोलिमध्ये कार्यरत खासगी सुरक्षा कर्मचाºयांना वेकोलि व्यवस्थापनाने तीन महिन्यांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले. वास्तविक हे सुरक्षा कर्मचारी मागील १५ ते २० वर्षांपासून वेकोलित कार्यरत होते आणि जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत होते. मात्र वेकोलि व्यवस्थापनाने स्वत:ला भ्रष्टाचारातून वाचविण्यासाठी आपली निती बदलवित सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. वेकोलि क्षेत्राच्या चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, माजरी, वणी नार्थ येथील हजारो सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकले. यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकारानंतर भारतीय मजदूर संघाशी संलग्नित भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या वतीने अनेकदा वेकोलि व्यवस्थापनाला निवेदन दिले. मात्र कर्मचाºयांवरील हा अन्याय कुणीही गंभीरतेने घेतला नाही.भारिप-बहुजन महासंघाचे धरणेआॅनलाईन लोकमतचंद्रपूर : २६ नोव्हेंबर २०१७ रोजी सरकारने भारतीय संविधानाची उद्देशिका प्रकाशित केली होती. त्यात भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत जाणीवपुर्वक बदल करण्यात आलेला आहे. त्या विरोधात भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान इतरही अनेक मागण्या लावून धरण्यात आल्या. त्यात शेतमालाला हमीभाव, १०० टक्के कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, पदोन्नतीमधील आरक्षण पुर्ववत ठेवावे, अतिक्रमण केलेल्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, खैरलांजी, जवखेडा प्रकरणांची सी.बी.आय. चौकशी करून सामाजिक न्याय द्यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष जयदिप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सेवचंद्र नागदेवते, भारिपचे महासचिव धीरज बांबोळे, संघटक कपूर दुपारे, कैविशताई मेश्राम, डॉ. प्रेमलाल मेश्राम, राजू किर्तक, रमेश ठेंगरे, पी.डब्ल्यू. मेश्राम, संजय उके, विजया भगत, रामजी जुनघरे, कृष्णा पेरकावार, रमेश लिंगमपेल्लीवार, लता साव, भाऊराव दुर्योधन, सुमित मेश्राम, सुभाष ढोलणे, बंडू ढेंगरे, धीरज तेलंग, गुरुबालक मेश्राम, राजु अडकिने, सिद्धार्थ जुलमे, अशोक पेरकावार, राजू देशकर, नागेश पथाडे, भीमलाल साव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.