राज्यात एप्रिल महिन्यापासून कडक लाॅकडाऊन लागल्याने व १४४ कलम जारी झाल्याने जास्त व्यक्ती एकत्र येता येत नव्हते. अशा स्थितीत गावाच्या विकासासाठी एप्रिल महिन्यात सरपंच, सचिवांनी मासिक सभेची नोटीस पाठविली. २७ एप्रिलला मासिक सभा बोलावली. त्यावेळी सर्व सदस्य उपस्थित झाले. परंतु विरोधी सदस्यांनी त्या सभेला विरोध केला व पाचपेक्षा जास्त सदस्य संख्या आल्याने तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ती सभा रद्द करण्यात आली व लगेच मे महिन्यात सभा घेणार होते. तेव्हा ग्रामसेवकाचे बंधू अपघातात मरण पावल्यामुळे ते सुटीवर गेले व ती ऑनलाईनची सभा घेण्यास सरपंचाला अडचण निर्माण झाल्यामुळे ती घेता आली नाही. परंतु ती मे महिन्याची सभा नियमानुसार जून महिन्याच्या १४ तारखेला घेण्यात आली, असे सरपंच सपना तामगाडगे व सचिवांनी म्हटले आहे.
विरोधकांच्या विरोधामुळेच मासिक सभा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:19 AM