चंद्रपूर :कोरोना संकटामुळे राज्य सरकारने लाॅकडाऊन केले. असे असले तरी नागरिकांचा बाहेर फिरण्याचा मोह काही कमी होताना दिसत नाही. काही ना काही कारण सांगून नागरिक बाहेर फिरतच आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मार्निंग वाॅकला जाणाऱ्यांची संख्या अधिक असून पहाटे गर्दी राहत नाही, त्यामुळे कोरोनाचे संकट नसते, असे त्यांचे म्हणणे आहे तर सायंकाळच्या सुमारासही घराबाहेर तसेच मोकळ्या मैदानात नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र शहरात बघायला मिळत आहे.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी मानवी साखळी तोडणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने लाॅकडाऊन केला. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. मात्र, नागरिक आजही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आम्हाला बाहेर फिरावेच लागते, शारीरिक व्यायाम कसा व्हायचा, असे प्रश्न ते उपस्थित करत असून मोठ्या प्रमाणात शहरातील बाहेरील भागात नागरिक फिरण्यासाठी जात आहे. विशेषत: जुनोना रोज, मूल रोड, बंगाली कॅम्प परिसर, दाताळा, पठाणपुरा गेट बाहेर तसेच बल्लारपूर रोडकडेही मोठ्या संख्येने सकाळी तसेच सायंकाळच्या वेळीही फिरण्यासाठी जात आहेत.
बाॅक्स
पोलिसांकडून सूट
कोरोना संकटामुळे राज्य शासनाने प्रथम संचारबंदी त्यानंतर लाॅकडाऊन केले आहे. असे असतानाही काही नागरिक पहाटे कुणीच नसते. त्यामुळे कोरोना होत नाही म्हणून पोलिसांची नजर चुकवून अगदी पहाटेच फिरण्यासाठी जात आहे. मात्र, यावर्षी अद्यापपर्यंत अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली नसल्याची माहिती मिळाली आहे.
बाॅक्स
खुली हवा नव्हे कोरोना विषाणू
शहरातील गर्दीच्या वातावरणातून बाहेर पडत पहाटे खुली हवा मिळते यासाठी काही नागरिक शहराबाहेर तसेच मोकळ्या मैदानांमध्ये फिरण्यासाठी जातात. मात्र, सध्याची कोरोना स्थिती बघता त्यांना खुली हवा नाही तर कोरोना विषाणूचा सामना करावा लागतो. हे मात्र नागरिक विसरले आहे.
बाॅक्स
या ठिकाणी नागरिकांची पसंती
चंद्रपूर शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांमध्ये वाढली आहे. त्यामुळे शहरात पाहिजे तशी मोकळी मैदानेच शिल्लक नाही. नाही म्हणायला पोलीस मैदान होते. यामध्ये काही नागरिक फिरण्यासाठी जात होते. कोरोना संकटापासून पोलीस प्रशासनाने तेही बंद केले आहे. दरम्यान, पठाणपुरा गेट बाहेर, दाताळा नदीच्या पुलावर, बंगाली कॅम्प, बल्लारपूर रोड, जुनोना रस्ता, स्टेडियम परिसर, आकाशवानी रोड आदी ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने मार्निंग तसेच इव्हनिंग वाॅकसाठी जात आहे.
कोट
कोरोनाची भीती वाटत नाही का?
कोरोना संकट आहे. मात्र घरात बसूनही आता कंटाळा आला आहे. त्यामुळे पहाटेला एखादी चक्कर मारून आल्यास बरे वाटते. शारीरिक व्यायामही, शरीराच्या हालचालीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे कधी-कधी पहाटे फिरण्यासाठी जातो. मात्र, मास्क तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळतो.
-रोहित ठाकूर
चंद्रपूर
-कोट
कोरोनाची दहशत सर्वत्र आहे. त्यामुळे बाहेर पडत नाही. मात्र, कोरोनाचे सर्व नियम पाळून शारीरिक व्यायामासाठी पहाटे फिरण्यासाठी जातो.
-इंद्रजित शेंद्रे
चंद्रपूर