वसंत खेडेकर बल्लारपूरआपल्या पिलाला छातीशी कवटाळून कळपासोबत सडक पार करीत असताना बसची धडक बसल्याने माकडीण जागीच ठार झाली. तिचे पिलू मात्र वाचले. या घटनेनंतर तिचे पिलू तेथेच आपल्या आईच्या पार्थिवाजवळ हताश आणि घाबरल्या मनाने बराच वेळ बसून राहिले. मदतीसाठी पिलाची नजर सारखी भिरभिरत राहिली. एवढ्यात बघ्यांची गर्दीही जमली. मात्र पिलू आईपासून हलले नाही. ही घटना शुक्रवारी घडली.घटनेनंतर काही वेळांनी वनविभागाचे कर्मचारी तेथे आले. त्यांनी त्या पिलाला हाकलून लावले. माकडीणचे पार्थिव वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर पिलू दूर जाऊन बसून आईच्या पार्थिवाकडे बघत राहिले. कळपातील बाकी माकडही पिलूजवळ येऊन बसले, त्याचे आपल्या भाषेतून सांत्वन करीत! नंतर, काही वेळांनी माकड त्या पिलाला आपल्या सोबत घेऊन निघून गेले. ही दुखद आणि हृदयस्पर्शी घटना बामणी- बल्लारपूर मार्गावर येथील गुरुनानक पब्लिक स्कूलजवळ घडली.आई ही सर्वच प्राणीमात्रात तिच्या पिलांना थेट हृदयाजवळची असते. आईला तिचे पिलू व पिलांना त्यांची आई जीव की प्राण असतात. अपघातात ठार झालेल्या माकडीणच्या ‘त्या’ दुदैवी पिल्याला त्याची आई अचानक अशी सोडून गेल्यानंतर त्याबाबतचे दु:ख त्यालाच ठाऊक ! म्हणूनच आई गतप्राण झाल्यानंतर आईच्या पार्थिवाजवळ तो शोकमग्न बसून राहिला. बघ्यांची गर्दी जमली. त्यांच्या कडे भिरभिरत्या नजरेने तो बघत जाई. त्या नजरेत त्याचा, आई मला सोडून गेली, असा मी काय गुन्हा केला, असा केविलवाणा प्रश्न असावा.
मातेचा विरह अन् भिरभिणारी नजर !
By admin | Published: October 09, 2016 1:29 AM