चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मोटार जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. या रॅलीत वाहतूक पोलीसही सहभागी झाले होते. वाढत्या अपघाताला आळा बसावा, वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत वाहतूक निरीक्षक ऑफिसपासून मोटार जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने एसटी वर्कशॉप ते शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी जनजागृतीसाठी काढलेल्या रॅलीबाबत क्लबचे कौतुक केले. रॅलीमध्ये असलेल्या वाहनावर जनजागृती बॅनर लावले होते. रॅलीमध्ये क्लबच्या पीडीसी विद्या बांगडे, अध्यक्ष कल्पना गुप्ता, सचिव शकुंतला गोयल, डिस्ट्रिक्ट ॲडिटर रमा गर्ग, पूनम कपूर, दुर्गा पोटुदे आदी उपस्थित होते.
इनरव्हील क्लबतर्फे मोटार जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:28 AM