लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहर तथा तालुक्यातील नागरिकांना विविध समस्या भेडसावत असून त्या सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात यावे, याकरिता मंगळवारला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा वरोरा तालुकातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच समस्यांची सोडवणूक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.मागील काही महिन्यांपासून वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. वीज बिलासोबत विक्री कर स्थिर कर आदी अनावश्यक कर लावून वीज बिल पाठविल्या जात आहे. त्यामुळे ग्राहकांना १ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंतचे वीज बिल भरावे लागत आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असून त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे विशेष निधीतून व अन्य निधीतून संपूर्ण महाराष्ट्रात व वरोरा तालुक्यात सिंमेट रोडचे व नालीचे बांधकाम करण्यात आले. परंतु अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे निदर्शनात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये निकृष्ट दजार्चे साहित्य वापरले गेले आहेत. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचे निदर्शनात येत आहे. तसेच वरोरा तालुक्यामध्ये पाण्याची समस्या गंभीर असून पिण्याचे पाणी दूषित आहे. तरी संपूर्ण तालुक्यात स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून जनसामान्य लोकांच्या समस्यांचे त्वरीत निराकरण करण्यात यावे, मागील अनेक वर्षांपासून वरोरा शहरामध्ये अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटूंबांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची लीज किंवा पट्टे देण्यात आलेले नाहीत.त्यामुळे अनेक कुटुंब शासनाद्वारे मिळणाºया लाभापासून वंचित आहेत. यापूर्वी नगरपालिकेने वेळोवेळी ठराव केलेले आहेत. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांना अनेक योजना पासून वंचित राहावे लागत आहे. या सर्व समस्या त्वरीत सोडविण्यात याव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने देण्यात आला.या शिष्टमंडळात विदर्भ सचिव भूपेंद्र रायपुरे, वरोरा तालुका अध्यक्ष राजकुमार डांग, तालुका उपाध्यक्ष अनिल झिलटे, कुंदन बुजाडे, अशोक भिमटे, तालुका संघटक जितू थूल, कायदेविषयक सल्लागार अॅड. विनोद हरले, शहर उपाध्यक्ष राजकुमार कांबळे, शहर उपाध्यक्ष, रमण खातरकर, धर्मा जिवने, सचिव गौतम चिकटे, सहसचिव प्रमोद पेटकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष योगिता भगत, शहर अध्यक्ष प्रज्ञा नळे, उपाध्यक्ष सुनम कांबळे आदी उपस्थित होते.
वरोरा तालुक्यात विविध समस्यांचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:05 AM
शहर तथा तालुक्यातील नागरिकांना विविध समस्या भेडसावत असून त्या सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात यावे, याकरिता मंगळवारला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी...
ठळक मुद्देबीआरएसपीची मागणी : तहसीलदारांना निवेदन