शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

वीज दरवाढीविरोधात आंदोलन

By admin | Published: November 27, 2015 1:20 AM

महावितरणने नुकतीच वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. वीज बिलामध्ये करण्यात आलेली वाढ ही सामान्यांसाठी जिवघेणी असून केलेली दरवाढ ही पूर्ववत करण्यात यावी....

चंद्रपूर : महावितरणने नुकतीच वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. वीज बिलामध्ये करण्यात आलेली वाढ ही सामान्यांसाठी जिवघेणी असून केलेली दरवाढ ही पूर्ववत करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.सीटीपीएस येथील प्रदूषणामुळे अनेक गंभीर आजाराशी नागरिकांना झटावे लागत आहे. सन २००३ च्या न्यायालयाच्या याचिकेनुसार विद्युत उत्पादित करणाऱ्या क्षेत्रात विद्युत बिलामध्ये जवळजवळ ७ टक्के सबसिडी देण्यात येते. परंतु आजपर्यंत चंद्रपूर शहराला कधीही वीज बिलामध्ये सबसिडी देण्यात आली नाही. नागरिकांच्या या रास्त मागण्यांना घेऊन चंद्रपूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक एमएसईबी कार्यालय (बागला चौक) बाबुपेठ, चंद्रपूर येथे वीज बिल दहन व धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला परिसरातील ३०० च्या जवळपास नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून महावितरणच्या विरोधात नारे देत होणाऱ्या अन्यायाचा निषेध केला. मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रकाश चंदनखेडे, विभाग अध्यक्ष महेश शास्त्रकार व शहर उपाध्यक्ष महेश वासलवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा महिला सुनिता गायकवाड, मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनपाचे सभापती सचिन भोयर, मनसे माजी जिल्हाध्यक्ष राजु अल्लेवार, मनसे जिल्हाध्यक्ष, रोजगार-स्वरोजगार संघटना चंद्रपूरचे राजु कुकडे, संपर्क प्रमुख मनसे रोजगार-स्वरोजगार संघटना चंद्रपूर प्रज्योत नळे, तालुका अध्यक्ष सुजय अवतरे, विभाग अध्यक्ष मनोज तांबेकर, मनविसेचे जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष मनसे चंद्रपूर जिल्हा मनदिप रोडे, मनविसेचे शहर अध्यक्ष विवेक धोटे, जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.एमएसईबी कार्यालय (बागला चौक) बाबुपेठ वार्ड चंद्रपूर येथे वीज बिलाचे दहन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित मनसेच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी कार्यालयासमोरच धरणा दिला. यावेळी सबंधित अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी संदीप शिडाम, भरत गुप्ता, सचिन कोतपल्लीवार, दुष्यंत लाटेलवार, राजु येंभूर्णे, सुतार, सुयोग धनवलकर, प्रगती भोसले, प्रशांत भोसले, देवांगण, कल्याण वालदे, अमजद शेख, तिरूपती बालाजी, शिवलाल वर्मा, भोयर बल्लारपूर, शुभम तितरे, चेतन डोईजड, शाहरूख शेख, दीपक पडोटी, सचिन झाडे, संजय आवळे आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)