शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

मालमत्ता करवाढीविरोधात आंदोलनच सुुरुच

By admin | Published: October 17, 2016 12:46 AM

महानगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता करात केलेल्या करवाढीच्या विरोधात आम आदमी पक्षाने एल्गार पुकारला आहे.

चंद्रपूर : महानगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता करात केलेल्या करवाढीच्या विरोधात आम आदमी पक्षाने एल्गार पुकारला आहे. ही करवाढ त्वरित रद्द करण्याच्या विरोधात पक्षातर्फे साखळी उपोषण करण्यात येत आहे. १३ आॅक्टोंबरपासून सुरु केलेले हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु ठेवण्यात आले.मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्तबोजा पडणार आहे. या करवाढीला आम आदमी पक्षाने विरोध दर्शविला आहे.नागरिकांवर लादण्यात आलेली ही करवाढ अन्यायकारक असून ती त्वरीत मागे घेण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, यावर प्रशासनाने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे या विरोधात पक्षाच्या वतीने साखळी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १३ आॅक्टोबरपासून गांधी चौक येथील महापालिका इमारतीसमोर या उपोषणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दुसऱ्या दिवशी संदीप पिंपळकर तर दुसऱ्या दिवशी आपचे विदर्भ प्रतिनिधी सुनील भोयर, विदीशा निमसरकर हे उपोषणात सहभागी झाले होते. १५ आक्टोबरला राजू कुडे हे उपोषणाला बसले आहे. या आंदोलनाला चंद्रपूर जिल्हा फूटपाथ दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अजबराव डंभारे, उपाध्यक्ष मारोतराव दोरखंडे, सहसचिव शेख अशरफी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.तर ४४२ नागरिकांनीही या करवाढीविरोधात आपले नोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)