ठिकठिकाणी जनजागृती सभा : शेकडो शेतकऱ्यांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शेतकरी संघर्ष समिती चिमूर तालुक्याने राज्यातील शेतकरी संपास पाठींबा दर्शविला असून चिमूर विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कृषीभूषण मोरेश्वर झाडे यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी रॅली काढून संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, यासाठी आंदोलन करण्यात आले. या जनजागृती रॅलीची सुरुवात जांभुळघाट येथून करण्यात आली.शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, धानाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळालाच पाहिजे, स्वामिनाथन आयोग त्वरित लागू करावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, पाच हजार रुपये शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी, २४ तास वीज पुरवठा करावा, जबरानज्योत धारकांना पट्टे द्यावे, मागेल त्याला बोरवेल द्यावी, शासनाने अधिग्रहित केलेल्या सुपीक जमीनीच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरीत समाविष्ठ करावे, घरकुल, सिंचन विहीर, शौचालयचे देयके त्वरीत देण्यात यावे, अंगणवाडीसेविका व मदतनीस याचे मानधन त्वरित देण्यात यावे, या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीने चिमूर तालुक्यात विविध ठिकाणी सभा घेऊन रस्त्यावर भाजीपाला फेकून शासनाचा निषेध केला. दरम्यान रविवारी जांभुळघाट, नेरी, मासळ, चिमूर, खडसंगी, भिसी व शंकरपूर येथे जाहीर सभा घेत शासनाच्या आश्वासनांचा प्रमुख नेत्यानी समाचार घेतला.यावेळी काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते डॉ. सतीश वारजूकर, जि. प. सदस्य गजानन बुटके, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रशांत कोल्हे, राकाँचे सुनील शेडमे, चिमूर जिल्हा संघर्ष समिती तथा आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र बंडे, कृषी सेलचे तालुकाध्यक्ष विजय गावंडे, उपसभापती शांताराम सेलवतकर, ममता डुकरे, गीता कारमेगे, घनश्याम डुकरे, लीलाधर बनसोड, अरविंद रेवतकर आदी उपस्थित होते.
रस्त्यावर भाजीपाला फेकून शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन
By admin | Published: June 12, 2017 12:43 AM