लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कृत्रिम रेतन केंद्राचे वार्षिक लक्ष्यांक पूर्ण न केल्याच्या कारणावरुन जिल्हा पशू संवर्धन अधिकाऱ्याने अरविंद मोरे, संदीप फरकाडे, संजय येलमुले या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ पशू चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी जि.प. समोर आंदोलन करण्यात आले.जि. प. पशु संवर्धन विभागातील कर्मचारी आदिवासी दुर्गम भागातही उत्तम सेवा देत आहे. मुख्यालय राहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासकीय योजनांची कामे करीत आहेत. शेतकरी कुटुंबांना भेटी देवून शासनाच्या सर्वच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असताना केवळ व्यक्तीद्वेषातून पशूधन पर्यवेक्षकांना निलंबित करण्यात आले. जिल्हा पशू संवर्धन अधिकाऱ्याने तोंडी आदेश देवून ही कारवाई केल्याने पशूधन पर्यवेक्षकांवर अन्याय झाला आहे. चुका नसताना ही कारवाई करून शासनाच्या सेवा शर्तींचा संबंधित अधिकाऱ्याकडून भंग केला जात आहे. हा प्रकार नियमबाह्य असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पशूचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन करून मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात बहुसंख्य पशूधन पर्यवेक्षक सहभागी झाले होते.
निलंबनाविरुद्ध पशुधन पर्यवेक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:31 AM
कृत्रिम रेतन केंद्राचे वार्षिक लक्ष्यांक पूर्ण न केल्याच्या कारणावरुन जिल्हा पशू संवर्धन अधिकाऱ्याने अरविंद मोरे, संदीप फरकाडे, संजय येलमुले या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ पशू चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी जि.प. समोर आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देकारवाईचा निषेध : पशुधन पर्यवेक्षकांमध्ये नाराजी