शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:04 AM

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा पाचवा दिवस : अधिकाºयांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे. मात्र पाच दिवस होऊनही अधिकाºयांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राजुरा तालुक्यातील साखरी येथील व परिसरातील वेकोलि प्रशासनाने जमिनी घेताना करारनामा करताना २०१२ च्या जमीन हस्तांतर कायद्याचा आधार घेण्यात आला. प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध होताच वेकोलि प्रशासनाने प्रकल्पग्रस्त ७०० वर शेतकºयांच्या फसवणुकीचे धोरण अवलंबिल्याने बल्लारपूर वेकोलि क्षेत्र विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आक्रोश उफाळून आला आहे. साखरी येथील हनुमान मंदीर परिसरातील पौनी-२ खाण येथे न्याय मागण्यासाठी लक्ष वेधण्यासाी २० आॅक्टोबरपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यासाठी ऐन दिवाळीच्या सणातही प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषण सोडले नाही. करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला मिळावा. सातबारा नमुन्यानुसार नोकरी द्यावी आदी अन्य मागण्याला धरून आंदोलन केले जात आहे.मात्र बल्लारपूर वेकोलिच्या अधिकाºयांची अद्यापही झोप उघडली नाही. मतांचा जोगवा मागणाºयांनीही ेआश्वासनाच्या पलीकडे काही केले नाही.आहे. भ्रष्टाचाराने बरबरटले वेकोलिच्या अधिकाºयांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्येशी काहीच करणे नाही, अशी वृत्ती जोपासून आहेत. बल्लारपूर वेकोलिने पौनी २ व ३ कोळसा खाण सुरू करण्यासाठी तब्बल ७०२ शेतकºयांशी करार केला. करारनाम्यानुसार २०१६ पर्यंत जमिनीचा मोबदला एकरी ८ ते १० लाख रुपये व कुटुंबातील बेरोजगारांना नोकरी देण्याचे मान्य केले. पौनी-२ क्रमांकाची कोळसा खाण सुरू करताना काही शेतकºयांना मोबदला देण्यात आला. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकºयांची दिशाभूल करून पौनी २ व ३ प्रकल्पातून कोळशाचे उत्खनन करूनही करारनुसार मोबदला व नोकरी देण्यास वेकोलिने टाळाटाळीचे धोरण स्वीकारले आहे.त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकºयात असंतोषाचा वणवा पेटला आहे. आंदोलनात साखरी येथील उत्तम बोबडे, अमोल घटे, यादव येरगुडे, शेषराव बोंडे, प्रमोद गाडगे, ज्ञानेश्वर येरगुडे, विजय बनसुले, लटारी भोयर, राकेश उरकुडे, शंकर उकीनकर, चंद्रकांत लेडांगे आदी प्रकल्पग्रस्तांसह शेकडो नागरीक सहभागी झाले आहेत.