शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बसस्थानक स्थानांतरणासाठी हालचाली

By admin | Published: May 23, 2016 1:01 AM

येथील विश्राम गृहाच्या जागेवर बसस्थानकाची निर्मिती व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असून नागभीड येथील

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष : बांधकाम व परिवहन मंत्र्यांशी करणार चर्चानागभीड : येथील विश्राम गृहाच्या जागेवर बसस्थानकाची निर्मिती व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असून नागभीड येथील काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया बांधकाम मंत्री आणि परिवहनमंत्री यांची भेट घेणार आहेत.नागभीड येथे बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली. पण ते बसस्थानक गावापासून बरेच लांब असल्याने अडगळीत पडले आहे. त्यातच नागभीड येथे चार ठिकाणी बसथांबे देण्यात आले असून हे बसथांबे प्रवाशांना गैरसोयीचे होत आहेत. जुन्या बसस्थानक वगळता तीन बसधाब्यांचे विसर्जन करुन विश्रामगृहाच्या जागेवर नवीन बसस्थानकाची निर्मिती करावी, अशी नागभीडकरांची मागणी आहे.लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर या मागणीने आणखीच जोर धरला. येथील भाजपाचे नेते गणेश तर्वेकर यांनी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची या विषयावर चर्चाही घडवून आणली. सर्वांनी या बाबीस दुजोरासुद्धा दिला. या चर्चेचा संदर्भ घेवून आमदार भांगडिया यांनी संबंधित विभागास या संदर्भात अहवाल तयार करण्याचा सूचना केल्या होत्या.विश्वसनीय माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात याचसंदर्भात एक सभासुध्दा शुक्रवारी झाल्याची माहिती आहे.एव्हढेच नाही तर या सभेचा अहवाल परिवहन विभागाला पाठविण्यात आल्याचीही माहिती आहे. दरम्यान, नागभीड येथे सा.बां. विभागाचे विभागीय कार्यालयसुद्धा मंजूर झाले असून विभागीय कार्यालयाच्या इमारतीचा निधीही मंजूर झाला आहे. या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. सां.बा. विभागाच्या इमारतीचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी दोन्ही विभागाच्या जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडावी, अशी मागणी आमदार किर्तीकुमार भांगडिया दोन्ही विभागाच्या मंत्र्याकडे करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)विश्रामगृहाच्या जागेवर बसस्थानक व्हावे व अडगळीत पडलेल्या बसस्थानकाच्या जागेवर सा.बां. विभागाचे विभागीय व विश्रामगृह व्हावे ही नागभीडकरांची मागणी आहे. ही मागणी रास्त आहे. या विषयावर संबंधित विभागाच्या बैठकी झाल्या आहेत. त्यात सकारात्मक विचार विनिमय झाला. आत २४ मे रोजी संबंधित सुपूर्ण विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत आहे. विश्रामगृहाच्या (सा.बां.) जागेवर बसस्थानक व्हावे, यासाठी आपण जातीने पाठपुरावा करणार आहोत.- कीर्तीकुमार भांगडिया, आमदार, चिमूर