चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढल्यानंतर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, मनपा, खासगी रुग्णालये, तालुका क्षेत्रात कोविड रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर तालुका पातळीवरील कोविड केंद्र बंद करण्यात आले. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय, मनपाचे वन अकादमी येथे कोविड केअर सेंटर सुरू आहे. परंतु, रुग्णाची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर अद्ययावत करण्याचे आदेश निर्गमित केले असून, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्राची पाहणी करीत असून, केंद्रात आवश्यक त्या गोष्टीची पूर्तता करीत आहेत.
बॉक्स
वनअकादमी चंद्रपूर २६
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर १२
क्राईस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल चंद्रपूर १०
डॉ. गुलवाडे हॉस्पिटल चंद्रपूर ४
डॉ. पंत हॉस्पिटल ५
डॉ. बुक्कावार हॉस्पिटल ७
श्वेता हॉस्पिटल ४
बॉक्स
मनपाचे चार कोविड केंद्र
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे एकूण चार कोविड केंद्र आहेत. त्यापैकी तीन केंद्र बंद असून, वनअकादमीतील केंद्र सुरू आहे. वनअकादमीतील केंद्रात २८० ते ३०० अद्ययावत बेडची व्यवस्था आहे. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार इतरही केंद्र अद्ययावत करण्यात येत असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांनी दिली.
कोट
चंद्रपूर येथील वनअकादमी सेंटरमध्ये रुग्ण ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यातील कोविड केंद्र अद्ययावत करणे सुरू आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने शक्यतो लगतच्या जिल्ह्यातील प्रवास टाळावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा.
- राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी.