लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून पाच महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे देण्यात आली. यामुळे बचतगटाच्या महिला स्वावलंबनाकडे वाटचाल करू लागल्या आहेत. सोमवारी येथील संताजी जगनाडे महाराज भवनात हा कार्यक्रम पार पडला.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मानव विकास मिशन कार्यक्रमाच्या जिल्हा नियोजन अधिकारी सरिता मुळेकर, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे, महिंद्राचे व्यवस्थापक सचिन जैन उपस्थित होते. तक्षशिला महिला बचतगट पळसगाव, लक्ष्मी महिला बचतगट येरगाव, क्रांतिज्योती महिला बचतगट देवाडा, तथागत महिला बचतगट माराई पाटण, अशा पाच बचत गटांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे जि. प. अध्यक्ष भोंगळे व महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मानव विकास मिशन अंतर्गत खऱ्या अर्थाने महिला स्वावलंबनाकडे वाटचाल करीत आहेत, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.महापौर घोटेकर म्हणाल्या, महिलांमध्ये जिद्द असते. त्यांना संधी मिळाली तर जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतात. मानव विकास मिशनच्या जिल्हा नियोजन अधिकारी मुळेकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने प्रोत्साहन दिल्या जात आहे याकडेही लक्ष वेधले.वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांनी मानव विकास मिशन अंतर्गत ट्रॅक्टर वाटपाच्या योजनेबाबत तसेच भविष्यात राबवण्यात येणाºया उपक्रमांची उपयोगिता विशद केली. पॅडी ट्रॉन्सप्लांटर, घोंगडी तयार करण्याचे युनिट व स्त्रीशक्ती कार्यक्रम आदी उपक्रम जिल्ह्यात सुरू असल्याचे सांगितले. योजनेचा लाभ घेणाºया महिला बचतगटाच्या सदस्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. शासनाची योजना कल्याणकारी असल्याचे मत मांडले. संचालन सहाय्यक सनियंत्रण अधिकारी विद्या रामटेके यांनी केले. यावेळी सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी रुपेश शेंडे, एन.पांडे, अमित चवरे, विनोद मुंगमोडे व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.पालकमंत्र्यांचे प्रयत्नराज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली. पाच वर्षांच्या कारकिर्दीत अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणले. राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांच्या लघुउद्योगासाठी स्वतंत्ररित्या २०० कोटींची तरतूद केली. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती करण्याचे आवाहन कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी केले.
महिला बचतगटांची स्वावलंबनाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:50 AM
जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून पाच महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे देण्यात आली. यामुळे बचतगटाच्या महिला स्वावलंबनाकडे वाटचाल करू लागल्या आहेत. सोमवारी येथील संताजी जगनाडे महाराज भवनात हा कार्यक्रम पार पडला.
ठळक मुद्देअनुदानावर मिळाले ट्रॅक्टर : मानव विकास मिशन कार्यक्रमाची फलश्रुती