चंद्रपूर : शिकवणी वर्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांना अडचण जात आहे. परीक्षा तोंडावर आल्याने प्रत्यक्ष वर्ग भरणे आवश्यक आहे. त्यामुळे शिकवणी वर्गासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी चंद्रपूर येथील शिकवणी वर्गाच्या संचालकांनी खासदार बाळू धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कोरोनामुळे शाळा तसेच शिकवणी वर्ग बंद करण्यात आले आहे. आत ९ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र शिकवणी वर्ग बंद आहे. जेईई, एनईईटीची तयारी करुन घेणारे शिकवणी वर्ग बंद आहेत. मागील दहा वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने शिकवणी सुरु आहे. मात्र आता परीक्षा तोंडावर आली असल्याने प्रत्यक्ष शिकवणी गरजेची आहे. तसेच शिकवणीसाठी पालक व विद्यार्थ्यांचा संचालकांवर दबाव वाढत आहे. त्यामुळे ४ जानेवारी २०२१ पासून कोरोनाचे नियम पाडून शिकवणी वर्ग सुरु करणार असल्याच्या माहितीचे पत्र शिकवणी वर्गाच्या संचालकांनी खासदार बाळू धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना इन्स्पायरचे संचालक विजय बदखल, रेझोक्सीचे प्रा. सलीम, सक्सेपाईंटचे प्रा. श्याम धामंदे, एलिवेटचे प्रा. नाहिद हुसेन, इनसाईटचे मयुर वनकर आदी उपस्थित होते.
शिकवणी वर्गासाठी संचालकांचे खासदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:28 AM