बॉक्स
यंदा परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार
मागील काही वर्षांत एमपीएससी परीक्षेच्या तारखेबाबत गोंधळ पाहण्यास मिळत आहे. या गोंधळात मुलांचे वय निघून जात आहे. त्यामुळे राज्य सरकार परीक्षांची तारीख कधी जाहीर करणार, हा प्रश्न आहे.
बॉक्स
क्लास चालकही अडचणीत
कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारल्यानंतर क्लास बंद करण्यात आले. त्यानंतर सर्व सुरू करण्यात आले असताना क्लास सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे बहुतेक क्लास बंद आहेत. ऑनलाइन क्लासला विद्यार्थी पाहिजे त्या प्रमाणात पसंती देत नाहीत. त्यामुळे मोठा फटका बसत आहे. त्यातत कोरोनामुळे अनेक विभागांची भरती झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले आहे.
-श्रीकांत साव, संचालक
------
शासकीय नोकरी लागेल या आशेने मुले ग्रामीण भागातून शहरात येऊन दिवस-रात्र एक करून अभ्यास करतात. मात्र, शासन भरती घेत नाही. मागील दोन वर्षांत अनेक विभागाच्या परीक्षा अद्यापही झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. क्लास बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.
-मंगेश सहारे, संचालक
---
दिवस-रात्र एक करून मुले परीक्षेची तयारी करतात. मात्र, शासन परीक्षा घेत नाही. अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जात आहे. त्यामुळे शासनाने त्वरित परीक्षा घेऊन भरती करावी.
अमित दुधे, विद्यार्थी
-----
शासकीय नोकरीच्या आशेने रेल्वे भरती व इतर विभागाचे अर्ज भरले आहेत; परंतु अद्यापही परीक्षा झाली नाही. जुलै महिन्यात परीक्षा होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही तारीख ठरविली नाही.
-पुष्पकांत डोंगरे, विद्यार्थी
----
ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार
कोरोनामुळे स्पर्धा परीक्षेचे वर्ग बंद करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.
गतवर्षात काही कोचिंग क्लासेसमध्ये मुलांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. सराव चाचण्या दिल्या.
यंदा मुले ऑफलाइन कोचिंगसाठी आग्रह धरीत आहेत. त्यामुळे कोचिंग क्लास सुरू करण्याची मागणी होत आहे.