आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : एकाच वर्षात विजेच्या स्पर्शाने सात वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी आता वनक्षेत्रालगतच्या शिवारात गस्त घालणार असून दोषींवर कारवाई बडगा उगारणार आहेत.वाघ तसेच अन्य वन्यजीवांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय संपत्तीची कधीही न भरून निघणारी हाणी होत आहे. एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना वाघांचे मृत्य ंिचंतेचा विषय बनला आहे. अनेक शेतकरी शेतीचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणात वीजप्रवाह सोडतात. यातून हरण, सांबर, रानडुक्कर, रानगवे, नीलगाई यासारखे तृणभक्षी प्राणी मृत्यू पावत आहेत. एकाच वर्षात ७ वाघांचा मृत्यू झाला आहे. तर गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील शेतकऱ्याचा रानडुकरांपासून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात अशा घटनांत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.अशा घटना टाळण्यासाठी आता वन विभागाच्या गस्ती पथकासोबत महावितरणच्या पथकांनीही गस्त सुरू केली आहे. तसेच शेतकºयांच्या शेतातील कुंपनांची तपासणी करून गावागावांत प्रबोधन केल्या जात आहे. मुल, पोंभूर्णा उपविभाग, राजुरा, वरोरा, चिमूर, चंद्रपूर उपविभाग आणि गडचिरोली उपविभागातील उपकार्यकारी अभिंयत्यांनी गस्त घालणे सुरू केले आहे. बेकायदशीरपणे विजेचा प्रवाह शेतीच्या कुंपनात सोडून फक्त वन्य प्राणीच नव्हे, तर शेतकºयांची शेती व जिवितहाणी होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. कुणाचेही नुकसान होऊ नये, अशी शेतकऱ्याची भावना असते. पण स्वत: शेतकरी, शेतमजुर आणि अन्य पाळीवप्राणी गाय, म्हैस व बैलाचाही बेकायदेशीरपणे लावलेल्या वीज प्रवाहाने मृत्यू झाल्याच्या घटना सतत वाढत आहेत.अशा घटनांमधून सर्वांचे जीवन सुरक्षित राहावे, राष्ट्रीय संपत्तीचेही नुकसान टाळता यावे, यासाठी जागृती सुरू आहे. परंतु, नियमाचे उल्लंघन केल्यास वीजकायदा २००३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशाराही या गस्ती पथकाने दिला आहे. त्यामुळे शेतकºयांनी अशा कृत्यापासून दूर राहावे.
व्याघ्र संवर्धनासाठी महावितरणचे अधिकारी गस्तीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:37 AM
एकाच वर्षात विजेच्या स्पर्शाने सात वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला.
ठळक मुद्देवाघांच्या मृत्यूची चिंता : कुंपणातून वीजप्रवाह सोडणाऱ्यांवर होणार कारवाई