लोकमत न्यूज नेटवर्कनेरी : येथील जनता विद्यालयातील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली. याबाबत तक्रार केली असता संस्थेकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अन्यायाविरोधात निषेध म्हणून नेरी येथे मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी व नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.जनता विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत संदीप बोदेले याने शाळेतील आदिवासी विद्यार्थिनी सोबत फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर त्याने तिच्याशी जवळीकता साधून गणिताच्या टिप्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलाविले. यावेळी तिला गुंगीचे चॉकलेट देऊन लैंगिक अत्याचार केला. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उजेडात आल्यानंतर कारवाई करण्यात पोलीस व संस्थेकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विविध संघटना, विद्यार्थी, पालकांच्या वतीने मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. हा मूक मोर्चा गावातील दसरा चौक ते पीएचसी चौकातून शंकर देवस्थान जवळील पटांगणावर पोहोचला. यावेळी शिक्षकाचा निषेध करून अत्याचारी शिक्षकाला फाशी द्या, मुलींचे शोषण थांबवा, मुलींना सुरक्षा द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व विलास डांगे यांनी केले. मोर्चाला एकलव्य सेना, भारतीय विद्यार्थी मोर्चा, श्रीराम जन्मोत्सव कमेटी, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, शिवसेना आदी संघटनांनी पाठींबा देत पदाधिकारी सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन गटशिक्षणाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.
पीडित विद्यार्थिनीच्या न्यायासाठी नेरीत मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:08 PM
येथील जनता विद्यालयातील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली. याबाबत तक्रार केली असता संस्थेकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अन्यायाविरोधात निषेध म्हणून नेरी येथे मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी व नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
ठळक मुद्देअनेकांचे समर्थन : शिक्षकाकडून अत्याचार प्रकरण