लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने मूग, उडीद व सोयाबिन खरेदीसाठी केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी कें्र सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.मूगाची आधारभुत किंमत ६ हजार ९७५ तर उडीदचा दर ५ हजार ६०० रुपये आहे. या दोन्ही पिकांसाठी नोंदणी करण्याचा कालावधी २५ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर २०१८ आहे. सोयाबिनचा आधारभूत दर ३ हजार ३९९ असून १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत नोंदणी करता येईल. सर्व खरेदी आॅनलाईन पध्दतीने होणार आहे. शेतकऱ्यांना ज्या तालुक्यात जमीन आहे त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. नोंदणीचा प्रारंभीक कालावधी १५ दिवसांचा ठेवण्यात आला आहे. नोंदणीकरीता आधार कार्डची छायांकित प्रत व मूग, उडीद , सोयाबीन पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक खरेदी केंद्रावर द्यावा. नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणी क्रमानुसार शेतमाल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
मूग, सोयाबीन खरेदी आॅनलाईन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:59 PM