शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:42 PM

वंचितच्या उमेदवाराचा प्रचार कोणाच्या पथ्यावर?

राजेश भोजेकरचंद्रपूर : देशाचे लक्ष लागून असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. महायुतीकडून राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री व सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे   महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट आणि काट्याची लढत होईल, असे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने जनतेचे लक्ष वेधून घेतले. याच सभेत मुनगंटीवारांनी भाऊ-बहिणीचा दाखला देत केलेले वक्तव्य त्यांच्याच अंगलट आले. काँग्रेसने याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न केला असला, तरी मोदींच्या सभेचा अंडरकरंट दृष्टिआड करता येणार नाही, असे चित्र आहे. मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले प्रचारात फारसा प्रभाव पाडताना दिसत नाहीत. वंचितचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या दोन सभांचा किती प्रभाव पडतो, हे बघण्यासारखे आहे. २०१९ मध्ये वंचितचे ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी १ लाख २० हजार मते घेतली होती. तुलनेत वंचितचे विद्यमान उमेदवार बेले एवढी मते घेतील, याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे अनुसूचित जाती व मुस्लिम समाजाला वंचितकडून प्रतिनिधित्व मिळण्याची आशा होती.  ते न मिळाल्याने निर्माण झालेली नाराजी कोणाच्या पथ्थ्यावर पडते हे बघण्यासारखे आहे. भाजप विकासाचा दृष्टीकोन मांडत आहे तर काँग्रेस विकासाची हमी देत आहे. यामध्ये कोण मतदारांना भावते, हे पाहणे रंजक असेल. काँग्रेसकडून अद्याप स्टार नेत्यांची जाहीर सभा झाली नसली तरी अखेरच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

२०१९ ची परिस्थिती दिसत नाही२०१९ मध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी ४४ हजारांच्या मताधिक्याने ही जागा जिंकली होती. त्यावेळी हंसराज अहीरांबाबत अँटीइन्कमबन्सी होती. सुरूवातीला काँग्रेसने विनायक बांगडे यांना तिकीट दिल्याने धानोरकरांना सहानुभूती होती. यावेळी तशी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न प्रतिभा धानेारकर करीत आहेत. त्यांनी आमदार म्हणून स्वतःला राजकारणात सिद्ध केले आहे. दमदार उमेदवार म्हणून त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली विकासकामे आणि त्यांची दूरदृष्टी ही बाब लक्ष्यवेधी ठरत आहे. जात फॅक्टरचा फायदा धानोरकर यांना होईल, ही बाब हेरून मुनगंटीवार यांनी कुणबी समाजासह अन्य समाजाला जवळ करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालवला आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

देशात १० वर्षांत मोदी सरकार आणि चंद्रपुरात आधीची पाच वर्षे भाजपचे हंसराज अहीर आणि त्यानंतरची चार वर्ष काँग्रेसचे बाळू धानोरकर खासदार होते. या काळात केंद्राचा एकही लक्षवेधी प्रकल्प जिल्ह्यात आला नाही.चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाचा अभाव आहे. शेतीवर एकही प्रक्रिया उद्योग नाही. उद्योगांचा जिल्हा असला तरीही स्थानिकांना रोजगार नाही. उलट प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतोय. कोळखा खाणी व इतर प्रकल्पांमुळे बेघर झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही रेंगाळत आहेत.

गटातटाचा कायहोणार परिणाम?nकाँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या शिष्टाईने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मनोमिलन झाल्याचे काँग्रेस गोटात बोलले जात होते. मात्र, चंद्रपुरातीलएका सभेनंतर वडेट्टीवार प्रचारात दिसले नाहीत. n२०१९ च्या पराभवातून हंसराज अहीर सावरलेले नाहीत. अप्रत्यक्षपणे ते मुनगंटीवार यांनी विरोधात काम केल्यामुळे भाजपाचा पराभव झाला, अशी खदखद नेहमी व्यक्त करतात. यावेळी अहीर प्रभावीपणे प्रचारात दिसत नाहीत.  

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrapur-pcचंद्रपूरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४