शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

मनपा अधिकारी सायकलने कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 5:00 AM

प्रत्येक शुक्रवारला कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतेही वाहन आणू नये व आणल्यास त्यांनी मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदर बाब वैयक्तिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे व आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारीसह आपल्या सभोवतालच्या संबंधित किमान पाच लोकांना महत्व पटवून या अभियानाची व्याप्ती पाठविण्यास सहकार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये कुतुहल : माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल मोहीम

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयुक्त राजेश मोहिते यांच्या पुढाकारात चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी शुक्रवारी सायकलने कार्यालय गाठले. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा २०२१ कार्यक्रम अंतर्गत प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आठवडयातून एक दिवस आपली दुचाकी व चार चाकी वाहनांचा वापर न करता सायकलने कार्यालयात येणे अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे सर्व मनपा अधिकारी, कर्मचारी सकाळी १० वाजताच्या सुमारास येथे प्रियदर्शनी चौक येथे एकत्र आले व तेथून सायकलने कार्यालयात येऊन मोहिमेची अंमलबजावणी केली.  माझी वसुंधरा अभियान २ आॅक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून लागू केले असून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत, निर्सगाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरिता हे अभियान सुरु केले आहे. या अभियान कालावधीत पंचतत्वाला व मानवी जीवनाला सहकार्य होण्याच्या हेतुने दर शुक्रवारी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी सायकलने (यंत्र विरहित) कार्यालयात यावे असा निर्णय चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी घेतला होता. याप्रसंगी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त  विशाल वाघ, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, शहर अभियंता महेश बारई, लेखाधिकारी संतोष कंधेवार,अंतर्गत लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, सर्व अभियंता, कर्मचारी स्वच्छता निरीक्षक यांनी सायकल अभियानात सहभाग नोंदविला.  

दर शुक्रवारी आता सायकलचप्रत्येक शुक्रवारला कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतेही वाहन आणू नये व आणल्यास त्यांनी मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदर बाब वैयक्तिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे व आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारीसह आपल्या सभोवतालच्या संबंधित किमान पाच लोकांना महत्व पटवून या अभियानाची व्याप्ती पाठविण्यास सहकार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Cyclingसायकलिंग