आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : पैशाची चणचण दूर करण्याच्या हेतूने चोरीचा कट रचून बनारसहून मित्राला बोलाविले. दोघांनी एका घरात चोरीच्या बेताने प्रवेश केला. याची कुणकुण लागताच घरातील मंडळी जागी झाली आणि चोरांचा प्रतिकार सुरू केला. अशातच झालेल्या झटापटीत चोरट्याकडून हिसकावलेल्या चाकूनेच त्यातील एकाचा खून झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही थरारक घटना चंद्रपुरातील राजीव गांधी नगरात बुधवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली.या प्रकरणी रामनगर पोलिसांनी घरातील चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. रितेश गुप्ता (२४) रा. बनारस असे मृताचे नाव आहे. पंकज उर्फ सुयोग राम प्रवेशसिंह ठाकूर (२८) रा. संजयनगर चंद्रपूर हा गंभीर जखमी आहे.पंकज ठाकूर व रितेश गुप्ता हे दोघे मित्र. पैशाची चणचण असल्याने पंकजने सुजीत हलदर यांच्या घरी चोरीचा कट रचला. ही चोरी करण्यासाठी त्याने रितेशला बनारसवरुन बोलाविले. बुधवारी रात्री १ वाजता रितेश चंद्रपुरात दाखल झाला. दोघांनीही मिळून चोरीच्या बेताने हलधर यांच्या घरात रात्री प्रवेश केला. घराचा दरवाजा सहज उघडला. कुणीतरी दरवाजा उघडून आत येत असल्याची चाहूल हलदर यांना लागताच त्यांनी आरडाओरड सुरू केली.यावेळी हलदर यांची झोपून असलेली दोन्ही मुले जागी झाली. यानंतर हलदर कुटुंबाने त्या दोन्ही चोरट्यांना पकडले. बचावासाठी रितेशने त्यांना चाकूचा धाक दाखवताच हलदरच्या मुलांनी त्याच्या हातून चाकू हिसकावला. दरम्यान त्यांच्यामध्ये चांगलीच झटापट झाली. अशातच रितेश गुप्ताच्या पाठीवर चाकू लागला आणि तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर हलदर परिवाराने त्या दोघांनाही काठीने जबर मारहाण केली. यानंतर त्यांनीच या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली.रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी सहकाºयांसह घटनास्थळ गाठले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जी. बानबले, हेडकॉन्स्टेबल फुलगमकर, पो. शि. अजय गिरडकर, दीपक कोटनाके सोबत होते. घटनास्थळी जखमी अवस्थेत पडून असलेल्या रितेश व पंकज या दोघांना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रितेशला मृत घोषित केले. पोलिसांनी सुुजीत हलदर (५५), अर्चना हलदर (५०), सुजम हलदर(२२), सुभ्रत हलदर (२५) यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३०७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप गोतमारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जी. बानबले करीत आहेत.
चंद्रपुरात चोरी करायला गेलेल्या युवकाचा खून, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 10:39 AM
पैशाची चणचण दूर करण्याच्या हेतूने चोरीचा कट रचून बनारसहून मित्राला बोलाविले. दोघांनी एका घरात चोरीच्या बेताने प्रवेश केला. याची कुणकुण लागताच घरातील मंडळी जागी झाली आणि झालेल्या झटापटीत चोरट्याकडून हिसकावलेल्या चाकूनेच त्यातील एकाचा खून झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
ठळक मुद्देकुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल