लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नरसिंहा चट्टे याची हत्या झाल्यानंतर इराणी लोकांविरुद्ध घुमसत असलेला रोष एकाएकी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र रामनगर पोलिसांसह वरिष्ठ पोलिसांनी तत्परता दाखवून लगेच तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेपासून पोलिसांनी उपासमार सहन करीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले. अद्यापही २०० पोलिसांचा ताफा परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.घटनेच्या एक दिवसापूर्वी नरसिंहा चट्टे याने अत्तू इराणी, सिराज उर्फ बबलू अली व शराफत अली यांच्याविरुद्ध खंडणीची तक्रार केल्यावरुन रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर तणाव निर्माण होऊ नये म्हणून ताबडतोब, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले व पोलीस उपनिरीक्षक संजय भारती हे सुमारे पाच कर्मचाºयांसह पोलीस निरीक्षक गोटमारे यांनी जलनगरातील घटनास्थळी पाठविले. यानंतर गु्न्हे शोध पथकासह सहायक पोलीस निरीक्षक धनंजय सायरे असे १४ जण व तीन ंअधिकारी गस्तीवर होते. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक संजय भारती व त्यांचे पथक हे सुमीत कांबळे यांच्या घराजवळ पायी गस्त घालत होते. ही गस्त हत्येची घटना घडल्यानंतर रात्री ११ वाजतापर्यंत वाढविण्यात आली होती. तत्पूर्वी ८.३० वाजताच्या सुमारास तिथे त्यांना उडीया मोहल्ला येथे भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर भारती यांचे पथक धावून गेले. त्यांनी भांडण सोडविले. नरसिंहा चट्टे हा खाली पडला होता. लगेच पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावून दुचाकीवरच नरसिंहाला घेऊन सामान्य रुग्णालय गाठले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक भारती यांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन लगेच पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविली. तोपर्यंत या घटनेने संतप्त झालेल्या लोकांनी रॉकेल आणि टायर गोळा केल्याची बाब पोलिसांच्या कानावर आली होती. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक भारती यांनी लगेच घटनास्थळावरून आरोपी अत्तु इराणी याला पकडून सरकारी वाहनाने तत्काळ रामनगर ठाण्यात नेले. यामुळे पुढचा अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलिसांना जेवण करायलाही वेळ मिळाला नाही, जे मिळाले त्यावर त्यांनी समाधान मानले. १२ तासांच्या दोन पाळी तयार करून पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे.या घटनाक्रमात खंडणी प्रकरणातील आरोपी सिराज उर्फ बबलू अली याला सहायक पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी घटनास्थळपरिसरातून अटक केली. या प्रकरणातील शराफत अली फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे.
पोलिसांमुळे टळला अनर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 1:05 AM
नरसिंहा चट्टे याची हत्या झाल्यानंतर इराणी लोकांविरुद्ध घुमसत असलेला रोष एकाएकी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ठळक मुद्देकेरोसीन व टायर केले होते गोळा : पोलिसांनी दाखविली तत्परता, परिस्थिती नियंत्रणात