शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड लाभदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:31 PM

‘बचतची सवय ही दिवस पाहून न करता ती ध्येय पाहून आजपासूनच सुरू करावी’, असे आवाहन आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे प्रशांत गुप्ता आणि नीलरत्न चौबळ यांनी केले.

ठळक मुद्देइव्हेस्टमेंट मंत्र : लोकमत, आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड जागृती सेमिनार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ‘बचतची सवय ही दिवस पाहून न करता ती ध्येय पाहून आजपासूनच सुरू करावी’, असे आवाहन आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे प्रशांत गुप्ता आणि नीलरत्न चौबळ यांनी केले.वाहतूक पोलीस शाखेजवळील हॉटेल सिद्धार्थ येथे ‘लोकमत’ आणि ‘आदित्य बिर्ला समूह’ यांच्या वतीने म्युच्युअल फंड मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, प्रसिद्ध आर्किटेक्चर स्वदेश गांधी, प्रसन्ना बोथरा उपस्थित होते. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर म्युच्युअल फंडबाबत आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे महाराष्ट्र-गोवा प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत गुप्ता यांनी उपस्थिताना सखोल माहिती दिली.गुप्ता म्हणाले, जितक्या लवकर बचतीची सुरुवात कराल, तितका फायदा तुम्हाला होणार आहे. खर्चाच्या नियोजनापेक्षा बचतीचे नियोजन महत्त्वाचे आहे. तसेच पैसे बचत कराताना रिस्क घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही रिस्क घेण्याचा निर्णय घेतला नाही तर रिस्क न घेणेच ही, रिस्क आहे. कमी वेळात जास्त पैसे मिळते, असे कुठे होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सुरुवातीपासूनच बचतीची सवय लावावी. काही जणांना एकाच ठिकाणी पैसे गुंतविण्याची सवय असते. मात्र हे योग्य नाही. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे, असे सांगितले.यावेळी गुप्ता यांनी बचतीची सवय लागण्यासाठी काय करावे, याचा संदेश देणारे काही व्हिडिओ नागरिकांना दाखविले. तसेच बचत केल्याचे फायदे आणि तोटेही उदाहरणासह नागरिकांना पटवून दिले.आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड कार्पोरेट ट्रेनर नीलरत्न चौबळ म्हणाले, ‘आपण कोणतीही वस्तू नव्हे तर सुविधा विकत घेतो. कुठली स्किम माझ्याकडे लाभदायक आहे. हे समजणे प्रत्येकाला महत्त्वाचे आहे. इक्विटीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली तर फायदा जास्त मिळतो. त्यासाठी ‘एसआयटी’ (सीसटॅमेटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन) महत्त्वाचा आहे. लवकरात लवकर बचत चालू करा. घरातील सर्व कुटुंबाला एकत्र करून ही बचतीची सवय लावा, असे सांगितले.म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक करावी, याचे सुमारे दोन तास मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रशांत गुप्ता आणि नीलरत्न चौबळ यांनी उत्तरे देवून शंकाचे निरसन केले. या शिबिराला चंद्रपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कडूकर यांनी केले.गुंतवणूक करताना घ्यायची काळजीफंड प्रकाराप्रमाणे विभाजन : म्युच्युअल फंडात पुढील प्रकार प्रामुख्याने आहेत. मनी मार्केट फंड, गिल्ट फंड (फक्त गव्हर्नमेंट सिक्युरिटीज) मध्ये गुंतवणूक करताना डेन्ट फंड, बॅलन्स फंड, इक्विटी फंड.आपल्या गुंतवणुकीची क्षमता कमी असली तरी आपण अगदी ५०० रुपयापासून गुंतवणूक करू शकता.इक्विटी म्युच्युअल फंड हा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे.यात गुंतवणूक अधिक फायद्याची.