विकास खोब्रागडे
पळसगाव (पिपर्डा) : शासनाने १५ ऑगस्टपासून शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतामधील पीकपेरा स्वत: भरावा, याकरिता ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲप विकसित केला आहे. या मोबाइल ॲपचा वापर करून, ई-पीक पाहणी मोहीम पळसगाव व परिसरात राबविण्यास सुरुवात झाली आहे.
पळसगाव पिपर्डा व परिसरात शेताच्या बांधावर जावून ‘ई-पीक पाहणी” मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणीच्या नोंदी मोबाइलमध्ये घेतल्या जात आहेत. ‘ई-पीक पाहणी’चे महत्त्व शेतकरी बांधवांना महसूल विभागाच्या तलाठी कोतवाल यांच्यामार्फतीने समजावून सांगितले जात आहे. गावपातळीवरून पीकपेरणी अहवालाची खरोखर व वास्तववादी माहिती संकलित व्हावी, तसेच ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे, या हेतूने पीक पेरणीबाबतची माहिती ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासनाकडून जिल्ह्यात उपलब्ध करून दिली आहे. या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे महसूल विभागाने आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने पळसगाव साजामधील तलाठी दडमल, विहीरगाव येथील तलाठी नागापुरे, पाटील कोतवाल यांच्या उपस्थितीत शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी माहिती भरण्यात येत आहे.
बॉक्स
अनेक शेतकऱ्यांकडे मोबाइल नाही
ई-पीक पेरा नोंदणी करण्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणीला समोर जावे लागत आहे. ग्रामीण भागातील ७५ टक्के शेतकऱ्यांकडे मोबाइल नाही. ई-पीक पाहणी ॲप्सद्वारे पिकाची नोंदणी करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पिकांची माहिती कशी भरावी, कायम पडीक क्षेत्राची माहिती कशी भरावी, बांधावरची झाडांची नोंदणी भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तलाठ्यांच्या माध्यमातून पीकपेरा भरण्याची मागणी होत आहे.
030921\img20210901125511.jpg
प्रत्येक्ष बांधावर जाऊन ई-पिक पाहणी योजना बद्दल शेतकरी वर्गाला प्रात्याक्षिक करून मार्गदर्शन करताना महसूल कर्मचारी